Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

18/10/2026

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल
पत्रकारिता

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

प्रशासनाने आता गोरगरिबांवर धाक दाखवण्याऐवजी शहरातील प्रभावशाली अतिक्रमणधारकांवरही तितक्याच कठोरतेने बुलडोझर चालवून कायद्याचा धाक निर्माण करावा
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मोहसीन शेख | संगमनेर
अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली प्रशासनाने हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्या, हातगाड्या आणि लहान दुकाने क्षणाचाही विलंब न लावता जमीनदोस्त केली. वर्षानुवर्षे कष्टाने उभा केलेला आपला उदरनिर्वाहाचा मार्ग डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून अनेक गरीब व्यावसायिक भावनिक झाले होते. या कारवाईदरम्यान संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संगमनेर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात नुकतीच अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र, ही मोहीम अत्यंत पक्षपाती आणि निवडक पद्धतीने राबवली गेल्याची भावना संगमनेरकरांमध्ये निर्माण झाली असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे गरिबांच्या छोट्या व्यवसायांवर अत्यंत कठोरपणे बुलडोझर चालवला जात असताना, दुसरीकडे शहरातील धनदांडग्या आणि प्रभावशाली घटकांच्या मोठ्या अतिक्रमणांकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचे चित्र दिसून आले. शहरातील नियमबाह्य शॉपिंग सेंटर्स, मंगल कार्यालये, हॉटेल्स, हॉस्पिटल्स आणि पार्किंगच्या जागा गिळंकृत करून वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या मोठ्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांना प्रशासनाने अभय दिल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रशासनाचा हा दुटप्पीपणा पाहून नागरिकांमधून ‘गरीबांवर सिंघम आणि श्रीमंतांसमोर शांत’ अशी टीका केली जात आहे.
कायदा सर्वांसाठी समान असायला हवा आणि जर ही मोहीम खऱ्या अर्थाने शहराच्या हितासाठी असेल, तर कारवाईचे निकषही सर्वांना सारखेच लागू झाले पाहिजेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. केवळ गरिबांना लक्ष्य करून शहराचे नुकसान करणाऱ्या मोठ्या अतिक्रमणधारकांना मोकळे सोडल्यास, प्रशासनाच्या निष्पक्षतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित राहील.
त्यामुळे प्रशासनाने आता गोरगरिबांवर धाक दाखवण्याऐवजी शहरातील प्रभावशाली अतिक्रमणधारकांवरही तितक्याच कठोरतेने बुलडोझर चालवून कायद्याचा धाक निर्माण करावा, अन्यथा ही मोहीम ‘अतिक्रमण हटाव’ नसून ‘गरीब हटाव’ मोहीम म्हणून ओळखली जाईल, असा इशारा संगमनेरकरांनी दिला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,183
अतिक्रमण मोहीम संगमनेर नगर परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरकरांची सुरक्षा होणार अधिक भक्कम; नगरपरिषदेसाठी २ नवीन अग्निशामक वाहनांना प्रशासकीय मान्यता, आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश! साक्षी सूर्यवंशी यांची माहिती

30/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — निवडणूक आयोग: गेंडा आणि गेंड्याची कातडी!

By Annant Ppangarkar18/10/20260

प्रवीण पुरो- भारतीय संविधानाने घटनात्मक अधिकार दिलेल्या कोणत्याही संस्थेवर पक्षपातीपणाचा वा राजकीय वरदहस्ताचा आरोप झाला,…

रविवार, १८ ऑक्टोबर —- वाचा तुमचे आजच्या दिवसाचे राशिभविष्य

18/10/2026

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.