Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?
पत्रकारिता

जिल्हाधिकारी साहेब एकदा रस्त्यावर पायी फिराच! संगमनेरातील अतिक्रमण हटाव मोहीम दिखावा की केवळ समाधान?

डोळ्यादेखत होणारी अतिक्रमणे पालिकेचे अधिकारी, कर्मचारी रोखू शकत नाहीत. मात्र अशा मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करत मोठा दिखावा करण्यात अधिकारी, कर्मचारी पुढे आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/08/2026Updated:05/08/2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

अनंत पांगारकर | संगमनेर 

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संगमनेर नगर परिषदेच्या माध्यमातून बुधवारी शहराच्या नाशिक-पुणे मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. नेहमीप्रमाणे पालिकेच्या या कारवाया केवळ फार्स ठरत असून बुधवारची कारवाई देखील यातलाच प्रकार असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या कारवाया सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये फेरफटका मारत नेमकी राबविली जाणारी अतिक्रमण हटाव मोहीम कशी असते हे बघावे असा सूर उमटत आहे.

अतिक्रमण मोहीम राबविताना निवडक अतिक्रमणांना हात लावू नये, आसपासची रस्ता अडविणारी अतिक्रमणे सोडून मध्येच एखाद्या व्यावसायिकाचे नुकसान करणे जेसीबीचा पंजा मारणे आणि अतिक्रमण मोहीम राबविल्याचा फार्स राबविणे हा येथील अधिकाऱ्यांचा नित्याचा भाग बनला आहे. डोळ्यादेखत होणारी अतिक्रमणे पालिकेचे अधिकारी, कर्मचारी रोखू शकत नाहीत. मात्र अशा मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करत मोठा दिखावा करण्यात अधिकारी, कर्मचारी पुढे आहे.

विशेष म्हणजे अतिक्रमणाविषयी ‘माध्यमांच्या’ माध्यमातून कोणतीही पूर्व सूचना न देता मनात येईल तेव्हा पालिकेचे पथकाकडून पोलीस, रक्षक दलाला सोबत घेऊन शहरात कारवाया केल्या जातात. पायऱ्या, ओटे तोडले जातात. सामान्य नागरिकांवर कारवाया केल्या जातात मात्र बड्या आणि वजनदार लोकांच्या पक्क्या बांधकामांना मात्र हात लावण्याचे धाडस दाखवले जात नाही असे आरोप होतात. या पार्श्वभूमीवर बुधवारी थेट मालपाणी लॉन्सच्या प्रवेशद्वारावर असलेली कमान तोडण्यात आली. याशिवाय आसपासच्या काही अतिक्रमणावर किरकोळ स्वरूपात जेसीबी चालला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कारवाईमुळे नेमके काय साधले गेले हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या रस्त्यालगच्या फुटपाथवर असलेली अतिक्रमणे मात्र या अधिकाऱ्यांना कधी दिसली नाही.

शहरात या अतिक्रमण मोहिमेची चर्चा सुरू होती. चर्चेतील रोष हा सत्ताधारी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांवर दिसून येत होता. विशेष म्हणजे ज्या मालपाणी लॉन्चच्या प्रवेशद्वारावरची कमान तोडण्यात आली त्या मालपाणी परिवारातील रचना मालपाणी संगमनेर नगर परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेविका आहेत. या कारवाईतून संबंधितांनी नेमका काय संदेश दिला हे मात्र अधोरेखित झाले नाही.

कारवाईच्या अनुषंगाने समाज माध्यमांमध्ये रचना मालपाणी आणि मनीष मालपाणी यांनी केलेला खुलासा चर्चेत आला आहे. काय आहे हा खुलासा….

लॉन्समधील आमच्या कर्मचाऱ्यांचा फोन आल्यानंतर तात्काळ मा. CO साहेबांशी संपर्क साधला होता. त्यावेळी मी त्यांना स्पष्टपणे सांगितले आणि, श्री. मनीष भाऊ देखील त्यांच्याशी बोलले, कोणतीही तातडीची कारवाई करू नये, अशी विनंती केली.

सदर अतिक्रमण कटरच्या सहाय्याने नियोजनबद्ध व सुरक्षित पद्धतीने काढणे शक्य होते. कारण ते कंपाऊंड वॉलला जोडलेले असल्यामुळे यंत्राच्या सहाय्याने कारवाई केल्यास कंपाऊंड वॉलचेही नुकसान होण्याची पूर्ण शक्यता होती. त्यामुळे आम्ही फक्त एक दिवसांचा अवधी मागितला होता, जेणेकरून कोणतेही नुकसान न होता आम्ही स्वतः योग्य पद्धतीने अतिक्रमण काढून घेऊ.

मा. सीओ साहेब त्यावेळी हो म्हनाले. मात्र, त्यानंतर दिलेल्या आश्वासनाची कोणतीही दखल न घेता घाईघाईने करण्यात आलेली कारवाई ही अत्यंत खेदजनक असून योग्य प्रशासकीय पद्धतीला धरून नाही. प्रशासनाकडून दिलेल्या शब्दाचा सन्मान राखला गेला असता, तर अनावश्यक नुकसान टाळता आले असते आणि हा विषय परस्पर समन्वयाने व सौहार्दपूर्ण वातावरणात निकाली निघाला असता.

प्रशासनाकडून अपेक्षा असते की नागरिकांना दिलेल्या आश्वासनाचा मान राखला जाईल आणि अशा प्रकरणांमध्ये संवाद व समन्वयाला प्राधान्य दिले जाईल. दुर्दैवाने, या प्रकरणात तसे झाले नाही, ही बाब निश्चितच विचार करण्यासारखी आहे.

मनीष मालपाणी म्हणाले…

आपल्या सर्वांना आठवत असेल की पोलीस निरीक्षक गोविंदराव पवार असताना अशीच एक मोठी मोहीम झाली होती आणि अनेकांनी नोटिस मिळाल्यापासून त्यांची बांधकामे स्वतः काढून घेतली होती. आम्ही देखील मालपाणी लॉन्सची कंपाउंड मागे घेऊन नवीन बांधली परंतु या वेळी PWD ने कोणतीही सुचना न देता डायरेक्ट JCB लावला. आम्हाला सांगितले असते तर आम्ही स्वखर्चाने गेट काढले असते … 

ठीक आहे, आता पाडलेच आहे तर पण आता त्यांनी सरसकट जेजे पुढे असतील त्यांचे अतिक्रमण काढण्याची हिम्मत दाखवावी… त्यात गरीब श्रीमंत , जातपात, धर्म आणि संस्था पाहू नये एकच न्याय सर्वांना, सर्वांनाच संगमनेर अतिक्रमण मुक्त पाहिजे ना ? मग करा सरसकट कारवाई.

आमचा सर्वांचा तुम्हाला पाठिंबा आहे …. आपले संगमनेर खरच अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे…आणि जो बस स्टैंड पर्यंत येऊन थांबलेला ४ लेन रोड, आ. गडकरींनी थेट पुलापर्यंत सैंक्शन केला आहे , तो जर हिम्मत दाखवून पूर्ण केला तर संगमनेरच्या वैभवात भर पडून नागरिकांना ही ते सोयीचे होईल…. पण तेवढी हिम्मत दाखवणार का??

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,117
अतिक्रमण मोहीम मालपाणी लॉन्स संगमनेर नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

संगमनेर शहरात वाढणार सीसीटीव्हीची नजर; विविध विकासकामांचे सोमवारी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार लोकार्पण

05/09/2026

संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
श्रद्धांजली

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

By Annant Ppangarkar20/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर येथील जेष्ठ पत्रकार विनोद बूब (वय ७८) यांचे रविवारी…

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026

वीज प्रश्नावर संगमनेर काँग्रेसचा ‘जनआक्रोश मोर्चा’; बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात जोरदार तयारी

19/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.