Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आधीच एक गुन्हा प्रलंबित… जामिनावर असताना अल्पवयीन मुलीवर बलात्कार… अल्पवयीन मातेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल… न्यायालयाने सुनावली…
गुन्हेगारी

आधीच एक गुन्हा प्रलंबित… जामिनावर असताना अल्पवयीन मुलीवर बलात्कार… अल्पवयीन मातेच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल… न्यायालयाने सुनावली…

पोलीस करणार आधीच्या गुन्ह्यातील जामीन रद्द करण्याची मागणी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २४ जुलै

चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीने लोणीच्या पीएमटी रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर अल्पवयीन मातेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात बलात्कार, पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागात राहणाऱ्या अल्पवयीन मातेने या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे (वय ३६, रा. तळेगाव दिघे, संगमनेर) याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७६(२)(N), ३७६(३) सह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता अटक केली असून त्याला तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. सातपुते यांनी संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर उभे करत तपासाकामी पोलीस कोठडीची मागणी केली असता जिल्हा न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी आरोपी बोडखे आला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अशी, आरोपी ज्ञानेश्वर संपत उर्फ सोपान बोडखे यांने गेल्या वर्षी एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला. तिच्याशी ठेवलेल्या शरीर संबंधातून ती गर्भवती राहिली. प्रसूतीसाठी तिला लोणीच्या पीएमटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी (२२ जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधीही एका अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात आरोपी जामीनावर… पोलीस करणार जामीन रद्द करण्याची मागणी

दरम्यान आरोपीकडे दोन दिवस शेतमजुरीचे काम करणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री घरात झोपलेली असताना आरोपी ज्ञानेश्वर बोडखे याने तिच्या खोलीत जात तिच्याशी झटून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भातील संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून १८ मे २०१७ रोजी भारतीय दंड विधान कलम ३६३, ३५४(अ)(१)(२) तसेच बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम ७, ८ प्रमाणे गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. हा जामीन रद्द करण्याची मागणी देखील तपास अधिकाऱ्यांकडून न्यायालयात केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,740
अत्याचार अल्पवयीन माता न्यायालय बलात्कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.