Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दीड लाखाच्या लाच प्रकरणात नगर एलसीबीच्या तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल… काय आहे प्रकरण
गुन्हेगारी

दीड लाखाच्या लाच प्रकरणात नगर एलसीबीच्या तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल… काय आहे प्रकरण

नगर एलसीबीचा नवा पराक्रम समोर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २४ जुलै 

आधीच जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेल्या आणि त्या विरोधात खासदार निलेश लंके यांनी उपोषण सुरू केलेल्या नगर एलसीबीच्या तत्कालीन पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध लाच लुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नाईक संदीप चव्हाण असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून त्याची तत्कालीन नेमणूक अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आली होती. चव्हाण सध्या नगरच्या दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहे. लाच लुचपतच्या नासिक पथकाने ही कारवाई केली असून लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला आहे.

लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या हॉटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंगमध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यामध्ये फिर्यादीच्या भावाला अटक न करण्यासाठी व ताब्यात घेतलेले असल्याने सोडून देण्यासाठी पोलीस नाईक संदीप चव्हाण याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपये लाचेची २२ मार्च २०२४ रोजी मागणी केली होती.

तडजोडीअंती दीड लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री मधुकर जाधव, पोलीस हवालदार संदिप वणवे, महिला पोलीस हवालदार ज्योती शार्दुल, पोलीस नाईक परशराम जाधव यांच्या सापळ्यात ही बाब स्पष्ट झाली होती. त्यामुळे पोलीस नाईक संदीप चव्हाण याच्या विरोधात लाच लुचपतच्या पोलीस निरीक्षक मीरा कौतिका वसंतराव आदमाने यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसापासून नगर एलसीबीच्या वादग्रस्त आणि भ्रष्टाचारी कारभाराविरोधात नगरचे खासदार निलेश लंके यांनी उपोषण सुरू केले आहे. या कारवाईमुळे लंके यांच्या उपोषणातील मागणीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,534
अहमदनगर पोलीस एलसीबी लाचखोरी लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar31/08/20260

आजचे राशिभविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी वेळ…

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.