Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमधील नगर अर्बनचा मोठा थकबाकीदार कर्जदार अमित पंडितने न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर १० कोटी ६४ लाख बँकेत भरले
गुन्हेगारी

संगमनेरमधील नगर अर्बनचा मोठा थकबाकीदार कर्जदार अमित पंडितने न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर १० कोटी ६४ लाख बँकेत भरले

पंडित संगमनेरमधील उद्योजक
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/07/2024Updated:27/07/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, २७ जुलै 

एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तीन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात जामीन मिळालेल्या नगर अर्बन बँकेचा कर्जदार संगमनेरमधील उद्योजक अमित पंडितने अखेर न्यायालयात कबूल केल्याप्रमाणे थकीत कर्जापोटी १० कोटी ६४ लाख रुपये बँकेत जमा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पंडितला नियमित जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात असून पत्नी, मुलगा आणि भागीदाराच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

नगर अर्बन बँकेतील बड्या कर्जदारांमध्ये अमित पंडितचा समावेश आहे. संगमनेरच्या सहकारातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी अमृतवाहिनी बँकेचा अनेक वर्ष अध्यक्ष असलेल्या अमित पंडितचे नाव नगर अर्बन बँकेच्या फॉरेन्सिक ऑडिट नंतर आरोपींमध्ये समोर आल्यानंतर संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी त्याला अटक करून या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले होते.

बराच काळ तुरुंगात राहिलेल्या पंडितला उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर तीन महिन्यांसाठी तात्पुरता जामीन मंजूर केला होता. यादरम्यान आरोपी पंडितने जामिनावर मुक्त होताच १५ दिवसाच्या आत २ कोटी तर त्यानंतरच्या ३ महिन्याच्या कालावधीत ८ कोटी ६४ लाख ३३ हजार ०४७ रुपये बँकेत भरण्याचे आदेश देण्यात आले होते. याशिवाय आणखी काही अटी न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पंडितने अखेर १०.६४ कोटी रुपये बँकेत जमा केले आहे.

दरम्यान संचालक मंडळाने ठरवून दिलेली रक्कम अमित पंडित याने बँकेत भरली असली तरी पंडित कडून बँकेला ४० ते ४५ कोटी रुपये घेणे आहे त्यामुळे तत्कालीन संचालकांनी १६ कोटी रुपयात हे प्रकरण कसे मिटविले, या विरोधात बँकेच्या अवसायकांनी अपील केले आहे. तसेच बँक गैरव्यवहार प्रकरणात आरोपींमध्ये पंडितचे नाव असल्याने न्यायालय याप्रकरणी काय निर्णय घेते, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

न्यायालयाच्या दणक्यामुळे काही दिवसांपूर्वी पुण्यातील बडा कर्जदार बिल्डर सुशील अग्रवाल याने देखील एक कोटी रुपये बँकेत जमा केले आहे. हे दोन्ही थकबाकीदार बँकेतील सर्वात मोठे थकबाकीदार समजले जातात.

केंद्र व राज्यातील राजकीय पाठबळाने नगर अर्बन बँक अक्षरशः लुटली गेली असल्याचा आरोप होत असून बँक बचाव समितीचे शिलेदार, माजी संचालक, फिर्यादी राजेंद्र गांधींसह ॲड. अच्युतराव पिंगळे, राजेंद्र चोपडा, अरूण बोरा असे अनेक जण नगर अर्बन बँकेसंदर्भात मोठ्या संघर्षातून सर्वजण एकजुटीने चिवट लढा देत आहेत. आर्थिक गुन्हे शाखा, न्यायालयाकडे सुरू असलेल्या त्यांच्या पाठपुराव्याचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,122
अमित पंडित नगर अर्बन बँक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.