Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुराचा धोका कायमस्वरूपी टाळण्यासाठी सरकार नवीन धोरण आणणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र संवाद विशेष

पुराचा धोका कायमस्वरूपी टाळण्यासाठी सरकार नवीन धोरण आणणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुण्यात पूरग्रस्त भागाची केली पाहणी
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 5, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ०५ ऑगस्ट

पुणे – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्याकरीता तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासनाच्यावतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

शिंदे यांनी पाटील इस्टेट शिवाजीनगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी, जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळा, एकता नगर सिंहगड रोड, खडकवासला येथे भेट देऊन रहिवासी तसेच स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, अण्णा बनसोडे, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुण्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर निळ्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्यात येईल. पूरबाधित नागरिकांना शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत करण्यात येत आहे. परंतु, पुराचा धोका कायस्वरुपी कमी करण्याकरीता शासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येईल. पुरबाधित घराचा प्रश्न मार्गी लावण्याकरीता नवीन विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (डीसीआर) तयार करण्यात येईल, घराच्या पुर्नविकासकरीता आवश्यकतेनुसार कायद्यात व नियमातही बदल करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

जुनी सांगवी येथील पूरग्रस्तांशी मुख्यमंत्री शिंदे यांचा संवाद…

मुख्यमंत्री शिंदे यांनी जुनी सांगवी परिसरातील स्थलांतरित पूरबाधित नागरिकांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळेत भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. शासनाकडून सर्व आवश्यक ती मदत करण्यात येत असून बाधित क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त सिंह यांनी पूरग्रस्तांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

एकता नगर येथे मुख्यमंत्र्यांची भेट…

सिंहगड रोडवरील एकता नगर येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच सुमारे दीड तास नागरिकांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यकता उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर या भागातील गटार लाईनची दुरुस्ती, पाण्याची नवीन लाईन टाकणे आदी पायाभूत सुविधा नागरिकांना पुरवाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे महानगर पालिका आयुक्तांना दिले. पूरबाधित भागातील विविध भागात मदत कक्ष सुरू करण्यात आले असून आरोग्य पथके आणि जवळपासची रुग्णालये सज्ज ठेवावीत, आदी सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरची त्यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. शिंदे यांच्या हस्ते पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 564
एकनाथ शिंदे पुणे पूर पाहणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.