Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » झोळे येथील वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश, झारखंड कनेक्शन… गावातील तरुणानेच केला खून
गुन्हेगारी

झोळे येथील वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश, झारखंड कनेक्शन… गावातील तरुणानेच केला खून

पोलीस यंत्रणेची कौतुकास्पद कामगिरी
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/08/2024Updated:09/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, ९ ऑगस्ट 

चार दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील झोळे गावात झालेल्या वृद्धाच्या खून प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

भूषण कांताराम वाळे (वय २३, रा. झोळे, ता. संगमनेर) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याला गुरुवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. दरम्यान याप्रकरणी झारखंड कनेक्शन समोर आले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4

५ ऑगस्टला सकाळी झोळे गावातील साहेबराव उनवणे (वय ७७ वर्ष) यांची झोपेत अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याने त्यांचा मृतदेह पहाटेच्या वेळी आढळून आला होता. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांना एक चिठ्ठी आढळून आली होती. या चिठ्ठीत झारखंड मधील काही व्यक्तींनी खंडणी घेऊन हा खून केल्याचे म्हटले होते.

या खुनाची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. सदरचे घातपाताचे प्रकरण गंभीर असल्याने उघडकीस आणण्याचा दृष्टीने देखील गुंतागुंतीचे आव्हानात्मक होते. घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आदींनी भेटी दिल्या होत्या.

पोलिस उपअधीक्षक वाघचौरे यांनी गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी तपासाची सूत्रे हाती घेत संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सॅलोमन सातपुते, पोलीस उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी राहुल डोके, राहुल सारबंदे यांचे व अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक धाकराव यांचे प्रत्येकी एक-एक अशी पोलिसांची तीन पथके आरोपींच्या मागावर पाठविले होती.

ही पथके मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक, घटनास्थळ परिसरावर जाणाऱ्या रस्त्यातील सीसीटीव्ही तपासणी, परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे झारखंड मधील व्यक्तींचा तपास आशा वेगवेगळ्या अंगाने गुन्ह्याचा तपास करत होते.

चिट्ठीत नमूद असलेल्या झारखंडमधील व्यक्तींकडे केलेला तपास, चिठ्ठीत लिहिलेले अक्षर, झोळे ते संगमनेर दरम्यान महामार्गावरील संपूर्ण सीसीटीव्हीचा केलेला अभ्यास व मोबाईलचा आरोपीने अतिशय चलाखीने केलेल्या वापराचे विश्लेषण यावरून वरील पथकांनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास करून यातील आरोपी भूषण कांताराम वाळे असल्याचे समोर आणले.

आरोपी वाळे यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आतापर्यंतच्या तपासात झारखंड येथे असलेल्या एका मुलीशी या आरोपीची इंस्टाग्रामवरून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर इंस्टाग्रामवरच प्रेमात झाले होते. इंस्टाग्रामवरील हे प्रेम टिकवण्यासाठी व पुढे नेण्यासाठी आरोपीने हा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. आरोपीला आणखी कोणी स्थानिकांनी मदत केली आहे किंवा कसे? गुन्ह्यात अन्य कोणी साथीदार आहे काय याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

या आरोपीवर यापूर्वी देखील दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक गुन्हा हा गुन्हा रजिस्टर क्रमांक १६४/२०१८ कलम ३०२, ३६३ हा खुनाचा गुन्हा दाखल असून दुसरा गुन्हा हा १३/२०२४ कलम ३७९ हा गुन्हा गायी चोरीचा आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,965
खून तालुका पोलीस सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.