Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

12/09/2026

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मानधन वाढीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बुधवारी मंत्रालयावर मोर्चा
महाराष्ट्र संवाद विशेष

मानधन वाढीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बुधवारी मंत्रालयावर मोर्चा

गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरूच
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, १९ ऑगस्ट 

मानधन वाढीसह अन्य मागण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बुधवारी (२१ ऑगस्ट) मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष ॲड. निशाताई शिवूरकर यांनी दिली.

राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करीत आहे. १५ जुलैपासून कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासकीय मिटींग, अहवाल देणे इत्यादी कामांवर बहिष्कार टाकला आहे. १२ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन सुरू आहे.

एकीकडे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे मात्र अंगणवाडी कर्मचारी बहिणींच्या प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्र शासनाबरोबर झालेल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या बैठकांमध्ये महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव शासनाला देण्याचे मान्य केले आहे.

कमी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाची लाडकी बहीण योजना यशस्वी व्हावी म्हणून प्रचंड कष्ट घेतले आहे. या कष्टाची जाणीव शासनाला नाही. मंत्री तटकरे केवळ तोंडदेखले कौतुक करत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अशा परिस्थितीत अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने बुधवारी (२१ ऑगस्ट) मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्रित होत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या कारणासाठी मोर्चा… सहभागी होण्याचे आवाहन…

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी द्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे मात्र राज्य सरकार कबूल करूनही ग्रॅच्युईटी देण्याचे टाळत आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सरकार विरोधात असंतोष असल्याने मानधन वाढ मिळावी, दरमहा पेन्शन मिळावी, ग्रॅच्युईटी मिळावी, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आहाराच्या रकमेत वाढ व्हावी, इत्यादी मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

नगर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या राज्य अध्यक्ष ॲड. निशाताई शिवूरकर, जिल्हाध्यक्ष सत्यभामा तिटमे, सरचिटणीस शांताराम गोसावी, भारती घरत, बेबी हरनामे, पूजा घाटकर, सुनंदा राहणे, शोभा नागरे, सुनंदा कदम आदींनी केले आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 809
अंगणवाडी निशाताई शिवूरकर मोर्चा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

संगमनेर तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांसाठी ६२ लाखांचा निधी मंजूर; नवीन वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा…

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.