Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » १३ दिवस आई-वडील आणि बहिणीशी संपर्क नाही, घरी जाऊन बघतो तर… त्याच्या पायाखालची जमीनच सरकली
महाराष्ट्र संवाद विशेष

१३ दिवस आई-वडील आणि बहिणीशी संपर्क नाही, घरी जाऊन बघतो तर… त्याच्या पायाखालची जमीनच सरकली

पालघरच्या वाडा तालुक्यातील घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/08/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, दि. ३१ऑगस्ट 

पालघर : १३ दिवस झाले तरी गावाकडील आई वडील आणि बहिणीची संपर्क झाला नाही. त्यामुळे मनात हजारो शंका निर्माण होत चलबिचल सुरू झाली आणि त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. गावाकडील घरी जाऊन दरवाजा उघडून बघतो तर काय, घरात पसरलेल्या प्रचंड दुर्गंधीत त्याला आई-वडिल आणि बहिणीचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत दिसून आले. समोरच दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती.

राज्यात दररोज येथे धक्कादायक घटना समोर येत असतानाच या घटनेत आणखी एका घटनेची भर पडली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळून आले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. पालघरच्या वाडा पोलिसांनी तीनही मृतदेह तपासणीसाठी ताब्यात घेत जे. जे. रुग्णालयात पाठवले आहे. वाडा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

नेमकं काय घडलं…

वाडा तालुक्यातील नेहरोली ग्रामपंचायत हद्दीत बोन्द्रे आळीत गेल्या पंचवीस वर्षांपासून गुजरातचे राठोड कुटुंब राहात होते. त्यांचा मोठा मुलगा सुहास हा गुजरात येथे तर लहान मुलगा पंकज विरारला राहत आहे. १३ दिवसांपासून घरच्यांसोबत संपर्क होत नसल्याने मनात नाना शंका कुशंका निर्माण झालेल्या अवस्थेत सुहासने गुजरातहून गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. गावी पोहोचलेल्या सुहासने घराचे आतून बंद असलेले दार ठोठावले. मात्र प्रतिसाद नाही मिळाल्याने त्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. 

घरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. नेमकं काय झालं समजत नव्हतं, त्याने घरात शोधाशोध सुरू केली तर समोरचा दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आई आणि बहिणीचा मृतदेह त्याला कुजलेल्या स्थितीत कपड्यात झाकून ठेवलेला दिसून आला. वडिलांचा मृतदेह बाथरूममध्ये होता.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.

https://maharashtrasanvadnews.com/wp-content/uploads/2024/06/VID-20240626-WA00511.mp4
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,342
पालघर वाडा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांची काँग्रेस पक्षाचे…

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026

आज रविवार, १३ सप्टेंबर— जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.