सोमवार, २८ ऑक्टोबर
संगमनेर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज व्होरा यांनी सोमवारी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्याकडे दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे अवघे काही तास उरले असून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघासाठी सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला. उमेदवारी जाहीर करण्यात वंचित ने आघाडी घेत या मतदारसंघातून विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सामान्य कुटुंबातील अजीज व्होरा यांना उमेदवारी दिली आहे.
संगमनेरमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि वंचित चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. समाजातील सर्व घटकात परिचित असलेल्या अजीज व्होरा यांचा जनसंपर्क लक्षात घेता त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन घडवून आणले.

कुरण रोड येथील कार्यालयापासून निघालेली त्यांची मिरवणूक शहराच्या विविध भागातून दुपारी उशिराने प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आली होती. यावेळी समाजातील मान्यवरांचा त्यांच्या समावेश समावेश होता. वंचितच्या रूपाने पहिल्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराने संगमनेरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल होतील.
संगमनेरमध्ये शक्ती प्रदर्शनाने वंचित बहुजन पक्षाचे उमेदवार अजीज व्होरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल
उमेदवारी अर्ज दाखल करण्यात वंचित आघाडीवर

