
दीपावली पाडवा
आजच्या दिवसाचे राशिभविष्य
मेष – आज आपण खूप धाडसी असाल, आक्रमकही असाल. आज कार्यमग्न असाल. कामांमध्ये प्रगती होईल. आजचा दिवस आपल्यासाठी अनुकूल असल्यामुळे संधीचा फायदा घ्या. अध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ – आज आपणाला अडचणीतून आणि तणावातून मुक्तता मिळणार आहे सहकाऱ्यांकडून आणि कुटुंबातील व्यक्तींकडून पूर्णपणे सहकार्य मिळणार आहे. आपल्या धैर्याने सर्व कामे पूर्ण करणार आहात.
मिथुन – आज आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास असणार आहे. आपला दृष्टिकोणही सकारात्मक असेल. आपल्या भावंडांच्या प्रकृतीविषयी कुरबुरी असू शकतील. कोणतेही मोठे बदल टाळा.

कर्क – आजचा दिवस चांगला जाणार आहे. आपल्या कार्यावर प्रकाश पडणार आहे. घरातील जबाबदाऱ्या पूर्ण करणार आहात. आर्थिक प्राप्ती चांगल्यापैकी होणार आहे. घरातील खर्च वाढणार आहेत.
सिंह – सामाजिक आणि कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. आत्मविश्वास पुरेपूर असणार आहे. मनावरील मरगळ दूर झाल्यामुळे उत्साही राहणार आहात. व्यक्तिमत्वाचा प्रभाव असणार आहे.
कन्या – आज आपल्या समोर येणाऱ्या प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जावे. आजचा दिवस फारसा आशादायक नसणार. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. अनावश्यक खर्च होऊ शकतो.
तुळ – नोकरीच्या संदर्भातील कामे आशादायक असणार आहेत. आपल्या कार्य क्षेत्रामध्ये नवीन बदल करायचा असल्यास करू शकता. व्यापार व्यवसायिकांना आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले असेल.
वृश्चिक – आपल्याला भरपूर काम करावे लागणार आहे. पण त्याचा मोबदला अतिशय चांगला मिळेल. फक्त काम करण्याची तयारी ठेवा. कुटुंबियांचे सहकार्य लाभणार आहे. व्यावसायिक पातळीवर प्रगती.
धनु – आज आपण खूप शांत आणि स्थिर असणार आहात. त्यामुळे आपण घेतलेले निर्णय बरोबर असणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करणार आहात. अध्यात्मिकदृष्ट्याही आपण सक्रिय असाल.
मकर – आज आपण फार दक्ष असणे आवश्यक आहे. काही अनपेक्षित समस्या उद्भवू शकतात. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवणे चांगले राहील. आरोग्याचे काळजी घेणे आवश्यक आहे.
कुंभ – घरातील वातावरण चांगले असेल. नातेसंबंध चांगले राहणार आहेत. मानसिक स्थैर्य चांगले असणार आहे. भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

मीन – आपला आज नोकरी-व्यवसायामध्ये अत्यंत अनुकूल काळ आहे. हाती घेतलेल्या कामांमध्ये पूर्ण यश मिळून ते पूर्ण होणार आहे. मात्र स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

