Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या पथकाने पकडली रोकड, स्कार्पिओत होता श्रीगोंद्याच्या उमेदवाराचा मुलगा
निवडणूक

अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या पथकाने पकडली रोकड, स्कार्पिओत होता श्रीगोंद्याच्या उमेदवाराचा मुलगा

निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सुरू आहे पैशाचा वापर
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar16/11/2024Updated:16/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, १६ नोव्हेंबर 

विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच अहिल्यानगरमध्ये नाकाबंदी दरम्यान कोतवाली पोलिसांच्या पथकाने एका स्कार्पिओतून दोन लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. विशेष म्हणजे ही स्कार्पिओ श्रीगोंद्याच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या कुटुंबीयांची असल्याची माहिती समोर येत असून या स्कार्पिओमध्ये नागवडे यांचा मुलगा देखील होता.

अहिल्यानगर जिल्ह्यात राज्यातील महत्त्वपूर्ण लढतींचा समावेश आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण लढती असलेल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर सुरू असल्याचे समोर येत आहे. उमेदवाराला पक्षाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाल्याचे देखील चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू आहे. अशातच नागवडे यांच्या पुत्रासह काहीजणांना रोकड रक्कम कोणत्याही पुराव्याशिवाय जवळ बाळगताना पकडण्यात आले आहे.

श्रीगोंदा मतदार संघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर शहरातील आयुर्वेद कॉर्नर येथे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान श्रीगोंदा येथील ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या मालकीच्या एम.एच. १२ यु.व्ही. २५२५ या क्रमांकाच्या पकडलेल्या स्कार्पिओत दोन लाख रुपयांची रोकड पथकाला आढळून आली.

स्कार्पिओमधून नागवडे यांचा मुलगा दिग्विजय राजेंद्र नागवडे (वय २० वर्ष, रा. श्रीगोंदा), गणेश राजसिंह शिर्के (वय २६ वर्ष, रा. बाबुर्डी, ता. श्रीगोंदा), अविनाश बाळू इथापे (रा. श्रीगोंदा फॅक्टरी, श्रीगोंदा) व ईश्वर अंबर मेहत्रे (रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) हे चौघेजण जात होते. यातील तिघांकडे ही रोकड आढळून आली.

आढळून आलेल्या पैशासंदर्भात संबंधितांना पथकातील कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी सदरची रोकड आणि स्कार्पिओ ताब्यात घेतली आहे. तसेच सदर रक्कम चौकशीसाठी समितीकडे वर्ग करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी ही माहिती दिली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,268
कारवाई रोकड पकडली विधानसभा निवडणूक श्रीगोंदा विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

घारगाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड: २ लाख ५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ५ आरोपी ताब्यात

22/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

By Annant Ppangarkar04/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर…

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्य परिषद करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन; १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.