Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » श्री गजानन महाराज शुगर देणार ऊसाला शाश्वत भाव – रवींद्र बिरोले
महाराष्ट्र संवाद विशेष

श्री गजानन महाराज शुगर देणार ऊसाला शाश्वत भाव – रवींद्र बिरोले

संगमनेरमधील पहिला खासगी कारखाना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, १८ नोव्हेंबर

संगमनेर – साखर धंदा मोठ्या अडचणीतून वाटचाल करत आहे. कारखाना कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत भाव देण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी दिली आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कौठे मलकापूर येथील ओसाड माळरानावर उभ्या राहिलेल्या श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या कारखान्याच्या आठव्या गळीप हंगामाचा शुभारंभ व बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र बिरोले यांच्या पत्नी अश्विनी व मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी विधीवत व शास्त्रोक्त पद्धतीच्या वैदिक मंत्रोपचारात पार पडला. यावेळी बिरोले बोलत होते.

बिरोले म्हणाले, कारखान्याच्या मशिनरीच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून या गळीप हंगामात दैनंदिन साडेतीन हजार मेट्रिक टनाने गाळप पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कारखान्याने समोर ठेवले आहे. कार्यक्षेत्राबरोबरच यावर्षी कारखाना शेजारच्या पारनेर, राहुरी, श्रीरामपूर, नेवासे, गंगापूर, वैजापूर आधी ठिकाणाहून ऊस आणून गाळप करणार आहे.

या हंगामात कारखाना शाश्वत ऊस भावासोबतच ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, तोडणी कामगार, वाहतूकदार या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे उसाच्या टनेजमध्ये वाढ होऊन सुरळीतपणे कारखाना चालविण्याचा व्यवस्थापन कसोशीने प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी अण्णासाहेब वर्पे, तानाजी बागुल, गुलाबराजे भोसले, नवनाथ ढेंबरे, आप्पासाहेब गुरसळ, आप्पासाहेब टेकुडे, नवनाथ खेमनर, योगेश खेमनर, सोपान वाळुंज, माधव थिटमे, जनरल मॅनेजर अप्पासाहेब शेंडे, चीफ इंजिनियर विजयकुमार खरात, प्रशासन व्यवस्थापक भाऊसाहेब मंडलिक, सिव्हिल इंजिनियर गोरक्षनाथ उबाळे, चीफ इंजिनिअर रोहिदास रसाळ, केशव वर्पे, शिवाजी नरवडे, वैभव सागर आदीसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,803
गळीत हंगाम शुभारंभ रवींद्र बिरोले श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.