Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा… या कुख्यात गुंडाची केली होती हत्या!
Uncategorized

६ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा… या कुख्यात गुंडाची केली होती हत्या!

१० डिसेंबर २०१४ रोजी घडली होती घटना
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar19/11/2024Updated:19/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

पुणे: कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी सहा आरोपींना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॉलिस्टिक एक्स्पर्टचा रिपोर्ट महत्त्वाचा ठरला. आरोपींकडून तीन पिस्तुले आणि तीन कोयते जप्त करण्यात आले होते. तब्बल दहा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस वाघमारे यांनी हा निकाल दिला.

दिलीप विठ्ठल कांबळे, अनिल लक्ष्मण सपकाळ, अमर दिनकर शेवाळे, अमोल नारायण शिंदे, प्रकाशसिंग चंदनसिंग बायस आणि श्याम चंद्रकांत जगताप अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

प्रकाश चव्हाण हे महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट व सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष होते. प्रकाश चव्हाण याची स्वतःची एक गुन्हेगारी टोळी होती. टोळीचा म्होरक्या प्रकाश चव्हाण याची परिसरात दहशत होती. या टोळीची दहशत मोडून काढण्यासाठी आरोपींनी आपसात संगनमत करून प्रकाश चव्हाण याचा गेम करण्याचा प्लॅन केला.

त्यानुसार, प्रकाश चव्हाण यांच्या हालचालीवर आरोपी पाळत ठेवून होते. दरम्यान, १० डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रकाश चव्हाण पूर्णानगर येथील एका सलूनमध्ये गेला. त्यावेळी हल्लेखोर सलून बाहेर दबा धरून बसले होते. प्रकाश चव्हाण सलूनच्या बाहेर येताच आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. तसेच, धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रकाश चव्हाण याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या हल्ल्यात प्रकाश चव्हाण याचे अंगरक्षकदेखील जखमी झाले. तसेच, एका आरोपीचा घटनेदरम्यान झालेल्या मृत्यूची अपघाती मृत्यू झाल्याची नोंद आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

न्यायालयात सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी एकूण २२ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी जखमी झाले. डॉक्टरांनी त्यांच्या दंडातून गोळी बाहेर काढली. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय नाईकपाटील, पोलिस निरीक्षक आर.बी उंडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) बिलाल शेख तसेच कोर्ट पैरवी पोलिस उपनिरीक्षक गोविंद मरभळ, हवालदार अनिल जगताप यांनी काम पाहिले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,276
न्यायालय प्रकाश चव्हाण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख — लातोंके भूत बातोंसे नही मानते…!

05/07/2026

संगमनेर पोलिसांचा धक्कादायक कारनामा; १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला २० वर्षांचा दाखवून तब्बल पाच महिने डांबले जेलमध्ये; न्यायालयानं बजावली नोटीस, तपासी अधिकारी अडचणीत!

01/07/2026

भोंदू बाबा राजेंद्र गडगेच्या पोलीस कोठडीत वाढ; अन्य आरोपी अद्याप फरारच! तपासात २०० हून अधिक व्हिडिओ…

28/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सांत्वन

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: तालुक्यातील जवळे कडलग येथे शेततळ्यात पाय घसरून कृष्णा…

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.