Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

28/09/2026

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

न्यायालयासमोर बाजू मांडताना सरकारी वकील ॲड. मच्छिंद्र गवते यांनी तपासातील गंभीर मुद्दे उपस्थित केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/09/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एलसीबीने अटक केलेल्या तौसिफ ताहीर कुरेशी याच्या पोलीस कोठडीत पुन्हा दुसऱ्यांदा बुधवारपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे पोलीस कोठडीच्या पुढील तीन दिवसात तपासात आणखी काय धक्कादायक माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे.

ड्रग्स प्रकरणी स्थानिक पोलिस अधिकारी उपनिरीक्षक श्रीकांत सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी कासिफ असद कुरेशी याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला होता. पोलिसांचा हा कथित कारनामा समोर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तपास अधिकारी उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांची कंट्रोल रूमला बदली केली. सावंत यांना कंट्रोल जमा केल्यानंतर श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून अहिल्यानगरच्या एलसीबी कडे सोपविला होता.

स्थानिक गुन्हे शाखा (LCB) अहिल्यानगरच्या पथकाने या प्रकरणाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तपासाला गती मिळाली आहे. स्थानिक पोलिसांकडील तपास काढून हा तपास आपल्याकडे वर्ग होताच एलसीबीने याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी तौसिफ ताहीर कुरेशी याला अटक केली होती. तर याप्रकरणी एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोन आरोपी अटकेत असून अन्य दोघे फरार आहेत. एलसीबीने अटक केलेल्या तौसिफ ताहीर कुरेशी याला न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली होती या कोठडीची सोमवारी मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार शेजवाड यांनी न्यायालयात वाढीव पोलीस कोठडीची (PCR) जोरदार मागणी केली.

न्यायालयासमोर बाजू मांडताना सरकारी वकील ॲड. मच्छिंद्र गवते यांनी तपासातील गंभीर मुद्दे उपस्थित केले. आरोपी तौसिफ याने तपासात सहकार्य न करता त्याच्या मोबाईलमधील अत्यंत महत्त्वाचे व्हॉट्सॲप चॅट आणि कॉल लॉग डिलीट केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपींच्या मोबाईलच्या CDR विश्लेषणावरून आरोपींमध्ये कॉल्स झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ड्रग्जच्या खरेदी-विक्रीसाठी झालेल्या आर्थिक व्यवहारांची ‘मनी ट्रेल’ शोधायची आहे; मात्र सलग आलेल्या बँक सुट्ट्यांमुळे बँक खात्यांची माहिती मिळण्यास विलंब झाला, असा युक्तिवाद पोलिसांतर्फे न्यायालयात करण्यात आला. या संघटित गुन्हेगारीचे जाळे नेमके कुणाकुणापर्यंत पसरले आहे आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना वाढीव कोठडीची गरज असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.

सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि LCB ने सादर केलेले पुरावे विचारात घेऊन न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर आरोपी तोसिफ कुरेशी याला ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढीव पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपी इमरान सौदागर आणि गुलाम फरीद कुरेशी यांचा शोध LCB ची पथके घेत असून लवकरच या ड्रग्ज रॅकेटमधील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 434
एमडी ड्रग्स कोठडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय न्यायालय
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चेक अनादर प्रकरणात संगमनेर न्यायालयाने आरोपीस ठोठावला एक वर्षाचा कारावास; दोन लाखांची नुकसान भरपाई व ९ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा निर्णय

23/09/2026

फायनान्सचा चेक बाऊन्स: अकोले तालुक्यातील कर्जदाराला ६ महिने कारावास आणि दुप्पट दंडाची शिक्षा

04/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

संगमनेर एम.डी. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोर कोणापर्यंत? जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं… आता एक नव्हे तर चार आरोपी

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरातील बहुचर्चित एम.डी. (M.D.) ड्रग्ज तस्करीत दररोज नवनवीन आणि धक्कादायक…

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.