Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात कारखान्याची पहिली उचल जाहीर, प्रतिटन देणार एवढी रक्कम; दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादकांना मोठा दिलासा

12/11/2026

आत्मनिर्भर भारतासाठी विखे पाटील कारखान्याचा बायोसीबीजी प्रकल्प ठरवणार दिशा; पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

12/11/2026

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका! २० नोव्हेंबरपर्यंत निळवंडेचे आवर्तन न सोडल्यास मोर्चाचा इशारा

12/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्याची पहिली उचल जाहीर, प्रतिटन देणार एवढी रक्कम; दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादकांना मोठा दिलासा
शेती व सहकार

थोरात कारखान्याची पहिली उचल जाहीर, प्रतिटन देणार एवढी रक्कम; दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादकांना मोठा दिलासा

कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
सन २०२६-२०२७ या गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल देण्याचा महत्त्वाचा निर्णय सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने घेतला आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली.
काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने हा शेतकरी हिताचा निर्णय घेतला असून, अल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या कमी पावसाच्या व दुष्काळी परिस्थितीत यामुळे ऊस उत्पादकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
या निर्णयाची सविस्तर माहिती देताना व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी सांगितले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली कारखान्याने नेहमीच तालुक्याच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान दिले आहे. प्रशासनातील शिस्त, काटकसर आणि पारदर्शक कारभार यामुळे कार्यक्षेत्रातील तसेच कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांचा थोरात कारखान्यावर नेहमीच दृढ विश्वास राहिला आहे. कारखान्याने सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
यंदा दुष्काळी परिस्थितीचे सावट असतानाही कारखान्याने दिवाळी सणापूर्वी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रतिटन २०० रुपये अनुदान दिले. तसेच कामगारांना २० टक्के बोनस आणि ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान अदा केले. याशिवाय दीपावलीच्या काळात सुमारे २२ कोटी ११ लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याने संगमनेरच्या बाजारपेठेला मोठी आर्थिक चालना मिळाली होती.
यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने ३२०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर केली आहे. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे अभिनंदन केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 144
ऊस दर उचल थोरात कारखाना पांडुरंग घुले बाळासाहेब थोरात
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आत्मनिर्भर भारतासाठी विखे पाटील कारखान्याचा बायोसीबीजी प्रकल्प ठरवणार दिशा; पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

12/11/2026

डॉ. सुजय विखे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख बिनविरोध

12/11/2026

अभिवादन आणि भंडारदरा धरणाच्या शताब्दीनिमित्त सांगितिक मेजवानीने संगमनेरकर मंत्रमुग्ध; संगमनेरचा ‘दिवाळी पहाट गाणी’ कार्यक्रम राज्यात सर्वोत्तम: बाळासाहेब थोरात

12/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात कारखान्याची पहिली उचल जाहीर, प्रतिटन देणार एवढी रक्कम; दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादकांना मोठा दिलासा

By Annant Ppangarkar12/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सन २०२६-२०२७ या गळीत हंगामात गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन ३२०० रुपये…

आत्मनिर्भर भारतासाठी विखे पाटील कारखान्याचा बायोसीबीजी प्रकल्प ठरवणार दिशा; पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

12/11/2026

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका! २० नोव्हेंबरपर्यंत निळवंडेचे आवर्तन न सोडल्यास मोर्चाचा इशारा

12/11/2026

डॉ. सुजय विखे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख बिनविरोध

12/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.