Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आत्मनिर्भर भारतासाठी विखे पाटील कारखान्याचा बायोसीबीजी प्रकल्प ठरवणार दिशा; पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

12/11/2026

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका! २० नोव्हेंबरपर्यंत निळवंडेचे आवर्तन न सोडल्यास मोर्चाचा इशारा

12/11/2026

डॉ. सुजय विखे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख बिनविरोध

12/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आत्मनिर्भर भारतासाठी विखे पाटील कारखान्याचा बायोसीबीजी प्रकल्प ठरवणार दिशा; पालकमंत्र्यांचे प्रतिपादन
शेती व सहकार

आत्मनिर्भर भारतासाठी विखे पाटील कारखान्याचा बायोसीबीजी प्रकल्प ठरवणार दिशा; पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाच लाख रुपयांचा धनादेश दुष्काळ सहाय्यता निधीसाठी शासनाकडे सुपूर्त करण्यात आला
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/11/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
बायोसीबीजी प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने सहकारी साखर कारखान्याना दिलेले पाठबळ आत्मनिर्भर भारतासाठी महत्त्वपूर्ण असून, उर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्यास प्रकल्पाची निश्चित मदत होईल असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातवतीने केंद्र सरकारच्या गोबर्धन योजनेअंतर्गत प्रतिदिनी १६ टन क्षमतेच्या बायोसीबीजी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रकल्प ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. शेतातील वाया जाणाऱ्या कचऱ्याचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊर्जेमध्ये रूपांतर करून हा प्रकल्प चालवला जाणार असून, या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून सहकारी साखर कारखानदारीला मोठे पाठबळ मिळत असल्याचे नमूद केले. तसेच नव्या प्रकल्पाची उभारणी आणि एकाच हंगामात एक लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण करून कारखाना राज्यात प्रथम स्थानी राहिल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाच लाख रुपयांचा धनादेश दुष्काळ सहाय्यता निधीसाठी शासनाकडे सुपूर्त करण्यात आला. सदर कार्यक्रमास कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सभासद उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 80
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना बायोसीबीजी प्रकल्प राधाकृष्ण विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

लोकांना आम्ही फक्त गाड्यांमध्ये फिरताना दिसतो, पण…; विखे पाटलांनी सांगितली मंत्रिपदाची इनसाईड स्टोरी

06/11/2026

राजहंस दूध संघाकडून दिवाळीनिमित्त ५० कोटी रुपये वर्ग; दोन संस्थांच्या माध्यमातूनच ७२ कोटी कोटी रुपये बाजारात, संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण

05/11/2026

जिल्ह्यातील राजकीय ‘सहमती एक्स्प्रेस’ आता संगमनेरच्या विकासाच्या रुळावर धावणार? अमोल शेलकरांचे नेत्यांना आवाहन

04/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

आत्मनिर्भर भारतासाठी विखे पाटील कारखान्याचा बायोसीबीजी प्रकल्प ठरवणार दिशा; पालकमंत्र्यांचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar12/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बायोसीबीजी प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने सहकारी साखर कारखान्याना दिलेले पाठबळ आत्मनिर्भर…

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका! २० नोव्हेंबरपर्यंत निळवंडेचे आवर्तन न सोडल्यास मोर्चाचा इशारा

12/11/2026

डॉ. सुजय विखे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख बिनविरोध

12/11/2026

अभिवादन आणि भंडारदरा धरणाच्या शताब्दीनिमित्त सांगितिक मेजवानीने संगमनेरकर मंत्रमुग्ध; संगमनेरचा ‘दिवाळी पहाट गाणी’ कार्यक्रम राज्यात सर्वोत्तम: बाळासाहेब थोरात

12/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.