Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

डॉ. सुजय विखे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख बिनविरोध

12/11/2026

अभिवादन आणि भंडारदरा धरणाच्या शताब्दीनिमित्त सांगितिक मेजवानीने संगमनेरकर मंत्रमुग्ध; संगमनेरचा ‘दिवाळी पहाट गाणी’ कार्यक्रम राज्यात सर्वोत्तम: बाळासाहेब थोरात

12/11/2026

शिक्षकांची तळमळ, ग्रामस्थांचा लोकसहभाग अन् माजी विद्यार्थ्यांचे योगदान; शिंदेवाडी शाळेचा प्रेरणादायी कायापालट!

12/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » डॉ. सुजय विखे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख बिनविरोध
राजकारण

डॉ. सुजय विखे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख बिनविरोध

निवड केवळ पदाची नियुक्ती न राहता जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या नव्या पर्वाची सुरुवात मानली जात असून, अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेची वाटचाल कशी राहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/11/2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात परस्परविरोधी विचार आणि राजकीय प्रवाह एकत्र आणत सहकाराच्या माध्यमातून नवी राजकीय समीकरणे जुळविणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली.
जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्यापासून ते जिल्ह्याच्या अर्थवाहिनीचे नेतृत्व करण्यापर्यंत डॉ. विखे पाटील यांनी केलेला प्रवास या निवडीच्या निमित्ताने चर्चेत आला आहे.
या निवड प्रक्रियेवेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळातील सदस्य डॉ. सुजय विखे पाटील, शंकरराव गडाख, रणजितसिंह देशमुख, अक्षय कर्डिले, बिपीन कोल्हे, मोनिका राजळे, राजश्री घुले, करण ससाणे, दत्ता पानसरे, सचिन जगताप, ज्योती प्रकाश शिंदे, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, अनुराधा नागवडे, संगीता जयंत वाघ, कारभारी जावळे, गणपतराव सांगळे, वैभव पिचड, संजीवनी शिंदे आणि सचिन घुमरे उपस्थित होते.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत सहकार क्षेत्रावर प्रभाव असलेल्या विविध राजकीय गटांना एकत्र आणणे आणि सामूहिक नेतृत्वाची भूमिका स्वीकारणे हे प्रमुख आव्हान होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री शंकरराव गडाख आणि सभापती प्रा. राम शिंदे या चार प्रमुख नेतृत्वांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडली. निवडणुकीत केवळ जागांचे गणित न मांडता त्यांनी विविध भागांतील संचालकांशी संवाद साधला, गैरसमज दूर केले आणि संघर्षाऐवजी चर्चेतून मार्ग काढत ‘सहकार विकास आघाडी’ची बांधणी केली.
२१ जागांच्या या निवडणुकीत विखे, थोरात आणि गडाख यांच्या सहमतीने स्थापन झालेल्या सहकार विकास आघाडीने १७ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर अकोले येथील अपक्ष संचालिका संजीवनी शिंदे यांनी पाठिंबा दिल्याने आघाडीचे संख्याबळ १८ वर पोहोचले. निवडीच्या दिवशी सकाळी झालेल्या बैठकीत सभापती प्रा. राम शिंदे गटाचे संचालक सचिन घुमरे आणि ज्योती प्रकाश शिंदे यांनीही डॉ. विखे आणि देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला, ज्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
डॉ. सुजय विखे पाटील यांना विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा आणि संस्थात्मक कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. जिल्हा बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी, विकास सोसायट्या आणि साखर कारखान्यांचे आर्थिक व्यवहार या बँकेशी निगडित आहेत. त्यामुळे आगामी काळात पीककर्ज वितरण, थकबाकी वसुली, बँकेची आर्थिक शिस्त, आधुनिक बँकिंगचा विस्तार आणि सहकारी संस्थांना बळकटी देण्याचे महत्त्वाचे आव्हान नव्या नेतृत्वासमोर असणार आहे.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून संघटनात्मक जबाबदारी सांभाळतानाच डॉ. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांना सहकाराच्या एका व्यासपीठावर आणून समन्वयाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे ही निवड केवळ पदाची नियुक्ती न राहता जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या नव्या पर्वाची सुरुवात मानली जात असून, अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि उपाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेची वाटचाल कशी राहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 80
अहिल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमन बाळासाहेब थोरात रणजीतसिंह देशमुख व्हॉइस चेअरमन निवड सुजय विखे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अभिवादन आणि भंडारदरा धरणाच्या शताब्दीनिमित्त सांगितिक मेजवानीने संगमनेरकर मंत्रमुग्ध; संगमनेरचा ‘दिवाळी पहाट गाणी’ कार्यक्रम राज्यात सर्वोत्तम: बाळासाहेब थोरात

12/11/2026

संगमनेरच्या राजकारणात ‘भाऊबीजे’चा अनोखा ट्विस्ट! धुळ्याहून आलेल्या शुभांगी पाटलांकडून अमोल खताळांचे औक्षण!

11/11/2026

आमदार अमोल खताळ यांनी कुटुंबीयांसमवेत साजरी केली भाऊबीज; बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हाच सणाचा खरा संदेश

11/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

डॉ. सुजय विखे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख बिनविरोध

By Annant Ppangarkar12/11/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात परस्परविरोधी विचार आणि राजकीय प्रवाह एकत्र आणत सहकाराच्या…

अभिवादन आणि भंडारदरा धरणाच्या शताब्दीनिमित्त सांगितिक मेजवानीने संगमनेरकर मंत्रमुग्ध; संगमनेरचा ‘दिवाळी पहाट गाणी’ कार्यक्रम राज्यात सर्वोत्तम: बाळासाहेब थोरात

12/11/2026

शिक्षकांची तळमळ, ग्रामस्थांचा लोकसहभाग अन् माजी विद्यार्थ्यांचे योगदान; शिंदेवाडी शाळेचा प्रेरणादायी कायापालट!

12/11/2026

गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

12/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.