Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पंकजा आणि धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी सरकारवर वाढता दबाव
गुन्हेगारी

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पंकजा आणि धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी सरकारवर वाढता दबाव

बीडमध्ये गँग ऑफ वासेपूर...
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/12/2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार २७ डिसेंबर

विशेष प्रतिनिधी / मुंबई

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मिकी कराड यांचे समर्थक समजल्या जाणारे फडणवीस सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी बीडमध्ये प्रचंड मोर्चा काढला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे या मोर्चात सहभागी होणार असल्याने प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि हत्येतील मास्टर माईंडची माहिती त्यांना दिली.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत त्यांनी विविध मागण्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी बोलताना वाल्मिक कराडसोबतच्या संबंधांवरून सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना ओपन चॅलेंज दिलं. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांना सुद्धा कडक इशारा दिला आहे.

ते म्हणाले की, धनुभाऊ आपले विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचं आहे. आमचं लेकरू मेलं त्याला नाय द्यायचा आहे. तुला कोणी घेरले आहे..? हा काही राजकीय विषय नाही. मोर्चात वंजारी समाजाचे लोक सहभागी होणार आहेत. मुस्लिम लोकही सहभगी होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री यांना टरबूज ही उपाधी सोशल मीडियाने दिली, पण काय झालं? आता मला ट्रोल करत आहेत. फेक अकाउंटवरून बोललं जात आहेत. दम असेल तर समोर येऊन बोला, असा इशाराही त्यांनी दिला.

धस यांनी वाल्मिक कराड संबंधांवरूनही मुंडे यांना चॅलेंज दिलं. ते म्हणाले की, माझे कसे संबंध कसे आहेत ते सांगा. मधुर आहेत की अमधुर आहेत. तुम्हीसुद्धा माझे मित्र होते. माझ्याकडे कागद आहेत, तारीखही सांगतो. कधीपासून ते माझे मित्र राहिले नाही.

रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी, सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे. थर्मलमधून जी राखेची गाडी निघते त्यावर कोणीतरी टोल वसूल करत आहेत. अमोल मिटकरी लहान आहे. तू कोणाच्या नादी लागतोय, या रगेलच्या नादी लागू नको. तुझं लय अवघड होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

धस म्हणाले की, बीडमध्ये महादेव ॲपमध्ये देखील असाच प्रकार झाला असून एकाच व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज रुपयांचा व्यवहार झाला आहे. याची ईडी चौकशी व्हायला हवी होती. तेथे दोन अधिकारी होते, त्यांची नावे एसपींना सांगितल्याचं धस यांनी सांगितलं. चांगलं काम करणारे अधिकारी बाजूला काढल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाचे धागे मलेशियापर्यंत गेले असल्याचं ते म्हणाले. महादेव ॲपसंदर्भात सुद्धा आका असावा असेही त्यांनी सांगितलं.

बीडमध्ये गँग ऑफ वासेपूर… 

सुरेश धस यांनी बोलताना बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरून हल्लाबोल केला. बीडमध्ये गँग ऑफ वासेपूर झाल्याची टीकाही त्यांनी केली. बीडजवळ कोणी जमीन घेतली ते बघा. परळी बाजार समितीने गाळे बांधले त्याचे तीन वर्षांपासून लोकार्पण झालेलं नाही. ते गाळे गायराण जमिनीत उभारले आहेत. चौदाशे एकर आसपास गायरान जमीनीवर आकाचे कार्यकर्ते तीनशे वीटभट्टी चालवत आहेत. त्या ठिकाणी एकूण सहाशे वीटभट्टी आहे. त्या ठिकाणी जे कॉम्प्लेक्स बांधले आहे. आका आता नवीन पॅटर्न वापरत आहेत त्यांनी तो आम्हाला सांगावा. आनंद चॅरिटेबल ट्रस्टला अडीच एकर जमीन मिळाली. परंतु, तिथं काहीही होऊ दिलं नाही. त्यामागे कोण आहे हे पहा असेही ते म्हणाले. आणखी खूप काही असून हळूहळू अनेक लोक पुढे येत आहेत. सुरेश धस हे महायुतीचे आमदार आहे. सत्ताधारी आमदारानेच हे प्रकरण उचललं असून त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,379
धनंजय मुंडे पंकजा मुंडे संतोष देशमुख सुरेश धस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या…

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026

२ वर्षे २ महिने तुरुंगवास अन् अखेर न्याय! पोक्सो खटल्यातून संगमनेरच्या तरुणाची सुटका; न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

16/10/2026

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.