Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » टोल नाक्यावर गुंडागर्दी करत कासट बंधूंना मारहाण करणारे पाच आरोपी नाशिकमध्ये पकडले
गुन्हेगारी

टोल नाक्यावर गुंडागर्दी करत कासट बंधूंना मारहाण करणारे पाच आरोपी नाशिकमध्ये पकडले

कासट बंधूंनी ज्यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा आरोग्य ते आरोपी अद्यापही मोकाट आहे. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे या आरोपींपर्यंत कधी पोहोचणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/01/2025Updated:02/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार, ०२ जानेवारी
संगमनेर – माजी नगराध्यक्ष दिवंगत भाजप नेते राधावल्लभ कासट यांच्या तीन मुलांसह त्यांच्या मित्राला नाशिक-पुणे मार्गावरील हिवरगाव पावसा टोल नाक्यावर गुंडागर्दी करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. संगमनेरकरांच्या संतापानंतर आणि मोर्चानंतर सुस्तावलेली तालुका पोलीस ठाण्याची यंत्रणा अखेर जागी झाली. वाहनाला धडक देणाऱ्या या घटनेतील पाच आरोपींना नाशिकमधून गुरुवारी पकडल्याची माहिती पत्रकाराऐवजी समाज माध्यमात प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.गेल्या आठवड्यात झालेल्या या प्रकारानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अतुल राधावल्लभ कासट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. आरोपींच्या अटकेसाठी व प्राणघातक हल्ल्याचे कलम पोलिसांनी या गुन्ह्यात वाढवावे. टोल नाका कायमस्वरूपी बंद करण्यात यावा या मागणीसाठी संगमनेर व्यापारी असोसिएशनसह संगमनेरकरांनी प्रांत अधिकारी, पोलीस उपअधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला होता.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह सर्वपक्षीय शेकडो पदाधिकारी संगमनेरकर या मोर्चात सहभागी झाले होते. दोन्ही आमदारांनी या घटनेला संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक जबाबदार असल्याचे आरोप केले होते.
संगमनेरकरांच्या संतापानंतर अखेर जाग आलेल्या तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी नासिकमध्ये असल्याचे पथकाला समजले. पथकाने नाशिकमध्ये जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्री केली असता त्यांना प्रथमेश धनंजय जाधव, संदीप राजाराम जाधव, जयेश बंडू भोर, गणेश भीमराव लोणे यांच्यासह एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत या पाचही आरोपींनी गुन्हा केला असल्याचे कबूल केल्याचे सांगण्यात आले आहे. यातील चौघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना शनिवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
असे असले तरी जखमी कासट यांनी दिलेल्या फिर्यादीतील आरोपी पोलिसांना अद्याप आढळून येत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तालुका पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होत आहे. कासट बंधूंनी ज्यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा आरोप केला ते आरोपी अद्यापही मोकाट आहे. पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे या आरोपींपर्यंत कधी पोहोचणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,624
कासट बंधू देविदास ढुमणे मारहाण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला बेड्या

29/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील भोजापूर प्रकल्पाच्या पूरचारीचा समावेश दमणगंगा–वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पात…

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026

आज सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

31/08/2026

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.