Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पालिकेच्या जागेत अवैधरित्या सुरू असलेले सागर वाईन्स देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी, अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना आजी-माजी नगरसेवकांसह स्थानिकांनी घातला घेराव; कारवाईसाठी उपोषणाचा इशारा
आंदोलन

पालिकेच्या जागेत अवैधरित्या सुरू असलेले सागर वाईन्स देशी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी, अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांना आजी-माजी नगरसेवकांसह स्थानिकांनी घातला घेराव; कारवाईसाठी उपोषणाचा इशारा

सदरील लायसन मिळविण्यासाठी लायसन धारकाने नगरपालिकेचे शिक्के, लेटर पॅड, त्याचप्रमाणे कराची पावती असे विविध दस्तावेज हे खोटे आणी बनावट पद्धतीने बनून लायसन मिळविणेकामी संबंधित कार्यालयाकडे सादर केले असल्याचा खुलासा नगरपालिकेने केलेला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/01/2025Updated:17/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

२० जानेवारीपासून दुकानासमोर बानोबी शेख करणार उपोषण

संगमनेर – संगमनेर नगर परिषदेच्या मालकीच्या मिळकतीवर अवैधरित्या सुरू असलेले दारू विक्रीचे दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली असून यासंदर्भात पालिका व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याने येत्या सोमवारपासून (२० जानेवारी) दुकान समोरील रस्त्यावर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून या उपोषणात सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक सहभागी होणार आहे, अशी माहिती तक्रारकर्त्या बानोबी शेख यांनी दिली आहे.

दरम्यान या विषयावरून दोन दिवसांपूर्वी संगमनेर नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी या परिसरातील नागरिक, माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी तसेच पोलीस प्रशासनाला घेराव घालत संबंधित दुकानावर कारवाई करण्याची मागणी केली होती. होते कागदपत्र बनवत परवानगी मिळविल्या संदर्भात या दारू दुकानासंदर्भात धक्कादायक माहिती समोर येऊन देखील कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत आपण उपोषणाचा मार्ग अवलंबत असल्याचे तक्रारकर्त्या महिलेने म्हटले आहे.

सागर वाईन हे दुकान गेल्या अनेक वर्षांपासून अवैधपणे सुरू असून याबाबत नगरपालिका प्रशासनला वारंवार अर्ज देऊनही कारवाई होत नाही, कारण खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे सदरील वाईन देशी दारु विक्री लायसन जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळविलेले गेले आहे.

सदरील लायसन मिळविण्यासाठी लायसन धारकाने नगरपालिकेचे शिक्के, लेटर पॅड, त्याचप्रमाणे कराची पावती असे विविध दस्तावेज हे खोटे आणी बनावट पद्धतीने बनून लायसन मिळविणेकामी संबंधित कार्यालयाकडे सादर केले असल्याचा खुलासा नगरपालिकेने केलेला आहे. असे खोटे आणी बनावट शिक्के, लेटर व दस्तऐवज बनवणाऱ्यावर नगरपालिकेने योग्य ती कारवाई करावी, तसेच सदरील वाईन देशी दारू दुकानचे लायसन धारक यांनी शासनाला खोटे कागदपत्र देऊन सरकारी जागेवरती अतिक्रमण करून देशी दारूचे दुकान खोट्या लायसनवर आजपर्यंत चालवत आहे,

दारुबंदी विभाग अहिल्यानगर व जिल्हाधिकारी अहिल्यानगर अशा या दोन्ही विभागांची व शासनाची देखील फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गंभीर गुन्हा नोंद करण्यात यावा. त्यांचे लायसन कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे, या अनाधिकृत दारूच्या दुकानाविषयी काल संगमनेर शहरामध्ये अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना स्थानिक नगरसेवक, नेते, पुढारी ग्रामस्थांनी प्रशासनाला घेराव घालत सदरच्या अवैध दारू दुकानाचा आपण त्वरित बंदोबस्त करून अवैध दाखले देऊन वर्दळीच्या व स्थानिकांना त्रास होईल अशा ठिकाणी टाकलेल्या दारूची दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली.

या देशी दारू दुकानाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांच्यासह सहकाऱ्यांनी तब्बल एक वर्षापासून योग्य पाठपुराव्याची लढाई सुरू ठेवली आहे, आता या संदर्भात दारूबंदी विभाग जिल्हा अधीक्षक अहिल्यानगर, संगमनेर नगरपालिका मुख्याधिकारी, शहर पोलीस निरीक्षक आणि संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आमरण उपोषणाचे निवेदन देऊन उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,215
उपोषण दारू दुकान बानोबी शेख
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

एमआयडीसीच्या जागेवर सौर प्रकल्प चालणार नाही! कौठे मलकापूर येथे भाजपचे आक्रमक आंदोलन; भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

19/08/2026

संगमनेर येथे आदिवासी विद्यार्थ्यांचे अर्धनग्न धरणे आंदोलन सुरुच; जयश्री थोरात यांची आंदोलनस्थळी भेट

17/08/2026

बिरेवाडीत पोल्ट्री शेडवर कारवाईसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरु; मांडवे-बिरेवाडी हद्दीतील तीन पोल्ट्रीचा वाद पेटला

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.