Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भगर आणि शेंगादाण्याची आमटी खाल्ली, दिंडीतील ५० हून अधिक भाविकांना विषबाधा; चौघे गंभीर… रविवारी पहाटे घडली घटना
महाराष्ट्र संवाद विशेष

भगर आणि शेंगादाण्याची आमटी खाल्ली, दिंडीतील ५० हून अधिक भाविकांना विषबाधा; चौघे गंभीर… रविवारी पहाटे घडली घटना

रविवारी पहाटे ही घटना घडली असून विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJanuary 26, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

दि. २६ जानेवारी-

तीर्थक्षेत्र माहूर शहरात असलेल्या ठाकूर बुवा यात्रेसाठी आलेल्या दिंडीतील भाविकांनी शनिवारी रात्री (२५ जानेवारी) भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या भाविकांना मळमळ उलट्या झाल्याने विषबाधेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात रविवारी पहाटे ही घटना घडली असून विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

तीर्थक्षेत्र माहूर शहरात दरवर्षी षट्तिला एकादशीला ठाकूर बुवा यांची यात्रा भरते. यात्रेसाठी राज्यभरातून अनेक ठिकाणच्या पायी दिंड्या माहूरमध्ये येत असतात. दिंड्यांसाठी मोकळ्या जागेत, विविध मठात आणि शहरातील मंदिराच्या परिसरात तात्पुरत्या राहत्या उभ्या केल्या जात असतात. शुक्रवारी (२४ जानेवारीला) हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील दिंडी देव देवेश्वर परिसरात दाखल झाली होती.

दिंडीतील भाविकांनी शनिवारी (२५ जानेवारी) दिवसभर देवदर्शन घेतल्यानंतर रात्री भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ली होती. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास यातील काही जणांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर अनेकांना असाच त्रास झाल्याने त्यांना तातडीने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सकाळपर्यंत रुग्णांची संख्या वाढत वाढत ५० वर गेली होती. विषबाधेच्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून माहूर ग्रामीण रुग्णालयातील भाविकांवर उपचार सुरू असून तहसीलदार किशोर यादव यांनी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना येथे बोलावत रुग्णांवर उपचार केले. दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची प्रकृती चांगली असून सायंकाळपर्यंत त्यांना उपचारानंतर सोडले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 859
माहूर विषबाधा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; संगमनेरमध्ये प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

July 21, 2026

जंतरमंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: सोनम वांगचुक रुग्णालयात दाखल; अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात… रात्री काय घडलं!

July 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, मंगळवार २८ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 27, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन…

सक्षम प्राधिकरणांच्या निकालानंतरही मंगळापूरचा रस्ता बंदच; संगमनेर तहसीलदारांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा सवाल

July 27, 2026

स्वामी समर्थ केंद्रात उच्चांकी २७ हजार पारायण संपन्न

July 27, 2026

आज, सोमवार २७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 27, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.