Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने घारगाव पोलिसांची मोठी कारवाई, गोवंश जनावरांसह वाहने पकडली… मोठ्या मुद्देमालासह संगमनेरच्या १० जणांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने घारगाव पोलिसांची मोठी कारवाई, गोवंश जनावरांसह वाहने पकडली… मोठ्या मुद्देमालासह संगमनेरच्या १० जणांवर गुन्हा दाखल

कारवाईमध्ये १७ गोवंश जनावरांसह संगमनेर मधील १० जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ वाहनांसह सुमारे १६ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. १५ फेब्रुवारी – प्रतिनिधी

वारंवार झालेल्या कारवाया आणि कधीही बंद न पडलेले संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखाने दररोज या-ना त्याकारणाने चर्चेत असतात. घारगाव पोलिसांनी बजरंग दलाच्या मदतीने अशीच एक मोठी कारवाई केली असून या कारवाईमध्ये १७ गोवंश जनावरांसह संगमनेर मधील १० जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ६ वाहनांसह सुमारे १६ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तलखान्याच्या माध्यमातून कत्तल केली जाते. येथील कत्तलखाने देशाच्या बहुतांश भागात प्रसिद्ध आहे. वारंवार कारवाया करून देखील पोलिसांसह नगरपालिका प्रशासनाला हे कत्तलखाने बंद करण्यात यश आले नाही. त्यामुळे कत्तलीसाठी दररोज मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची ने-आण केली जाते. गुरुवारी (१३ फेब्रुवारी) अशाच काही गोवंश जनावरांची पीकअपमधून संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या खालची माहुली या गावाच्या शिवारात पुणे-नाशिक महामार्गावर साईबाबा मंदिरासमोर सहा वाहनांमध्ये गोवंश जनावरे यामध्ये गाया, वासरे चारा पाण्याविना दाटीवाटीने बांधून भरून घेऊन जात असताना आढळून आले.

बजरंग दलाचे कार्यकर्ते रोशन रमेश कवडे (रा. जवळे बाळेश्वर, ता. संगमनेर), ऋषिकेश सखाराम भोर आणि दादाभाऊ अण्णा खरात यांनी या गाड्या अडविल्या आणि संबंधितांवर घारगाव पोलिसांनी कारवाई करावी म्हणून पोलिसांना कळविले.

त्यानंतर याप्रकारे घारगाव पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेत गुन्हा दाखल केला असून जनावरांनी भरलेल्या सहा पिकअप व इतर गाड्या ताब्यात घेतल्या.

याप्रकरणी फारुख युसुफ सय्यद (रा. अलकानगर, संगमनेर), शहाबाज अजिज शेख (रा. कुरण रोड, संगमनेर), शब्बीर शेख (रा. संगमनेर खुर्द, संगमनेर), संतोष सखाराम भिसे (रा. डिग्रज, ता. संगमनेर), मोबीन शेखलाल शेख (रा. मदिनानगर, संगमनेर), साद शफिक शेख (रा. संगमनेर खुर्द, संगमनेर), अजीज छोटू शेख (रा. संगमनेर खुर्द, संगमनेर), अजय सुरेश शिंदे (हिवरेतरफे, नारायणगाव), अजहर मोईन शेख (रा. संगमनेर खुर्द, संगमनेर) व माणिक बाळू मोरे (रा. डिग्रस, ता. संगमनेर) अशा दहा जणांवर रोशन रमेश कवडे यांच्या फिर्यादीवरून प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अन्वये कलम ११, ३ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,353
कारवाई गोवंश कारवाई घारगाव पोलीस बजरंग दल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

By Annant Ppangarkar16/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्यासाठी सकारात्मक विचारांनी भरलेला असेल. दिवसभरात एखादी गोड…

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.