Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ठाकरेंची शिवसेना तिथीनुसार भव्य दिव्य करणार शिवजयंती… समिती गठीत अध्यक्षपदी गोविंद नागरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब घोडके
धार्मिक

ठाकरेंची शिवसेना तिथीनुसार भव्य दिव्य करणार शिवजयंती… समिती गठीत अध्यक्षपदी गोविंद नागरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब घोडके

अशी आहे शिवसेना (ठाकरे) उत्सव समिती... बाळासाहेब घोडके (कार्याध्यक्ष), गोविंद नागरे (अध्यक्ष), वेणूगोपाल लाहोटी व अक्षय गाडे (उपाध्यक्ष), पप्पू कानकाटे (खजिनदार)
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 24, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. २४ प्रतिनिधी 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यावर्षी देखील शिवाजी जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. यासाठी उत्सव समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी गोविंद नागरे तर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब घोडके यांची निवड करण्यात आली आहे.

तिथीनुसार येत्या १७ मार्चला शिवजयंती उत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीमध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्याबद्दल चर्चा करण्यात आली. यासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. शिवसेनेकडून दरवर्षी शिव जयंती उत्सव साजरा केला जातो. संध्याकाळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवभक्त, नागरिक देखील या मिरवणुकीत सहभागी होत असतात. यावर्षी देखील ही मिरवणूक भव्यदिव्य स्वरूपात काढली जाणार आहे.

मिरवणुकीत उंट, घोडे, रथ, ताफा, डीजे, ढोल, ताशा पथक आदिसह पारंपारिक वाद्य, पारंपारिक वेशभूषेचा समावेश असतो. संध्याकाळी नगरपरिषद प्रांगणातून निघणारी ही मिरवणूक लाल बहादूर शास्त्री चौक, बाजारपेठ, तेलीखुंट, सय्यद बाबा चौक, मेन रोड, चावडी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी शेवटी येते. शिवजयंती उत्सवा दरम्यान संपूर्ण संगमनेर भगवेमय झालेले असते. शिवजयंती उत्सव समितीचा देखील या मिरवणुकीत सहभाग असणार आहे. शिवसेना शाखेच्या वतीने शिवनेरी वरून येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत केले जाईल.

शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समिती पदाधिकाऱ्यांचे शिवसेना संगमनेर विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांनी अभिनंदन केले. बैठकीला माजी शहर प्रमुख अमर कतारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेना उपजिल्हाप्रमुख वैभव अभंग, युवा सेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रकाश गायकवाड, पंकज पडवळ, माजी शहर प्रमुख प्रसाद पवार, नितीन आनाप, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, माजी युवा तालुकाप्रमुख राजू सातपुते, ज्येष्ठ शिवसैनिक दीपक साळुंके, व्यापारी आघाडी शहर प्रमुख संभव लोढा, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य विजय सातपुते, रंगनाथ फटांगरे, तसेच रिक्षा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

अशी आहे शिवसेना (ठाकरे) उत्सव समिती… बाळासाहेब घोडके (कार्याध्यक्ष), गोविंद नागरे (अध्यक्ष), वेणूगोपाल लाहोटी व अक्षय गाडे (उपाध्यक्ष), पप्पू कानकाटे (खजिनदार)

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,154
उत्सव समिती शिवजयंती शिवसेना उद्धव ठाकरे गट
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्वागत व पूजन

July 5, 2026

पेमगिरीत वटपौर्णिमा उत्सवात दोन हजार फळझाडांचे वाटप; महिला सन्मानासह दिला पर्यावरणाचा संदेश

June 29, 2026

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या; आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला निर्देश

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडगाव शिवारात एका १५ वर्षीय…

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.