Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

July 17, 2026

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विजेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचे एमएससीबीला निवेदन, वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार; शेतकऱ्यांचा इशारा
आंदोलन

विजेचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचे एमएससीबीला निवेदन, वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार; शेतकऱ्यांचा इशारा

मागील तीन महिन्यांपासून तो विज पुरवठा सुरळीत होत नाही. अवघी चार तास लाईट मिळते. शिवाय ती अत्यंत कमी दाबाने असते. ही वीज व्यवस्था सुरळीत होऊन पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा झाला पाहिजे.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMarch 4, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्यात वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. या समस्यांबाबत महावितरणाने तात्काळ उपाययोजना करून ह्या प्रश्नाबाबत तातडीने मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

तालुक्यातील नागरिकांच्यावतीने वीज वितरण कंपनीला हे निवेदन देण्यात आले असून यावेळी अरुण गुंजाळ, नामदेव शिंदे, वीरधवल साबळे, दीपक शिंदे, सुहास आहेर, प्रीतम साबळे, सुनील काळे, विजय राहणे, भाऊराव रहाणे, ताराचंद शिंदे, विलास मोरे आदींसह शेतकरी संख्येने उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, रोटेशन कालावधीमध्ये यापूर्वी प्रवरा नदीच्या काठावरील शेतकऱ्यांना अखंडित व सुरळीतपणे पूर्ण दाबावे ११ तास वीज पुरवठा करण्यात येत होता, मात्र मागील तीन महिन्यांपासून तो विज पुरवठा सुरळीत होत नाही. अवघी चार तास लाईट मिळते. शिवाय ती अत्यंत कमी दाबाने असते. ही वीज व्यवस्था सुरळीत होऊन पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा झाला पाहिजे.

संगमनेर तालुक्यातील विविध सबस्टेशन अंतर्गत असलेल्या ॲग्री व गावठाण फिडरवर फक्त चार तास विद्युत पुरवठा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पिके जळून चालली आहे, तरी महावितरण सर्व फिडरवर तात्काळ पूर्ण दाबाने व पूर्ण वेळ आठ तास विद्युत पुरवठा केला पाहिजे. तसेच नादुरुस्त रोहित तात्काळ बदलून मिळावे अशा प्रमुख मागण्या आहे.

तरी वरील सर्व प्रश्नांबाबत महावितरणाने तात्काळ उपायोजना कराव्यात अन्यथा महावितरण कार्यालयावर पुढील ८ दिवसात तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची महावितरणने दक्षता घ्यावी. आंदोलनाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ती सर्वस्वी जबाबदारी महावितरणची राहील असा इशाराही सर्व शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 876
आंदोलन वीज वितरण कंपनी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरकरांच्या हक्काची रेल्वे शिर्डीकडे पळवली; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप, संगमनेरकरांनी आता रस्त्यावर उतरावे!

June 30, 2026

राजकीय गद्दारीच्या विरोधात माकप राज्यभर तीव्र निदर्शने करणार: डॉ. अजित नवले

June 21, 2026

संगमनेरमध्ये उबाठा गटाच्या पदाधिकारी, शिवसैनिकांकडून गद्दारी करणाऱ्या खासदार वाकचौरे विरोधात आंदोलन; ७ जणांसह इतर आंदोलकांवर गुन्हा

June 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शिक्षण

यू डायस अहवाल: राज्यातील हजारो शाळा पायाभूत सुविधांअभावी अंधारात, डिजिटल शिक्षणाचा दावा ठरतोय फोल

By अनंत पांगारकरJuly 17, 20260

प्रवीण पुरो | मुंबई: राज्यात डिजिटल शिक्षण, स्मार्ट क्लासरूम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मोठ्या घोषणा…

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

आज, शुक्रवार १७ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.