Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत… महिलेला पाठवले स्वतःचे विवस्त्र फोटो
गुन्हेगारी

महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत… महिलेला पाठवले स्वतःचे विवस्त्र फोटो

गोरे यांना अटक होऊन दहा दिवसाची जेलवारी देखील झाली होती. त्यानंतर सातारा जिल्हा न्यायालयात गोरे यांनी पीडित महिलेची लेखी माफी मागितली तसेच पुन्हा त्रास देणार नाही अशी वकिलामार्फत हमी दिली होती.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/03/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज 

महायुती सरकारच्या काळात राज्यात लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. सरकारमधील मंत्र्याने विकृतीचा कळस गाठला असून मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री संबोधल्या जाणाऱ्या जयकुमार गोरे यांनी स्वतःचे विवस्त्र अवस्थेतील फोटो एका महिलेला पाठविल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन सामनाने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. यात म्हटले आहे की, पीडित महिलेने राज्यपालांना पत्र पाठवून मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी १७ मार्चपासून विधानभवनासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. राज्यपालांना पाठविलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना पाठविण्यात आली आहे.

पीडित महिलेने संपूर्ण घटनाक्रम पत्राद्वारे मांडत आपली व्यथा मांडली आहे. जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार असून महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत. २०१६ मध्ये आमदार असताना गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असलेल्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली होती.

गोरे यांनी अनेक महिने स्वतःचे विवस्त्र अवस्थेतील फोटो पीडित महिलेला व्हाट्सअप वर पाठविले होते. गोरे यांच्या त्रासाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक टाळण्यासाठी त्यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय धाव घेतली मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर गोरे यांना अटक होऊन दहा दिवसाची जेलवारी देखील झाली होती. त्यानंतर सातारा जिल्हा न्यायालयात गोरे यांनी पीडित महिलेची लेखी माफी मागितली तसेच पुन्हा त्रास देणार नाही अशी वकिलामार्फत हमी दिली होती.

मात्र महायुती सरकारमध्ये गोरे आता ग्रामविकास मंत्री असल्याने त्यांनी पुन्हा महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी २०२५ पासून अनेक व्हाट्सअप ग्रुप वर पीडित महिलेने २०१६ मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली त्यामुळे पीडित महिलेचे नाव उघड झाले व तिची बदनामी झाली. त्यानंतर ९ जानेवारीला पीडित महिलेच्या घरी पत्र आले त्यात तिने केलेली २०१६ ची तक्रार होती. हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू असल्याचे राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,193
जयकुमार गोरे महायुती सरकार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज बुधवार, २ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar02/09/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. कामाच्या…

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.