Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्याच्या निवडणुकीत रंगत! उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; दिग्गजांसह इतक्या उमेदवारांनी ठोकले दंड
निवडणूक

थोरात कारखान्याच्या निवडणुकीत रंगत! उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; दिग्गजांसह इतक्या उमेदवारांनी ठोकले दंड

या निवडणुकीत राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरचे नवनियुक्त आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून विरोधक उमेदवार उभे करणार असल्याने, निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या निवडणुका सहसा बिनविरोध होत आल्या आहेत. मात्र, यावेळेस बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/04/2025Updated:08/04/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, दि. ८ एप्रिल – प्रतिनिधी

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच वेग घेतला आहे. उद्या (९ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने आज दिवसभर इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत विरोधकांनी देखील सक्रिय सहभाग दर्शविला असून, विद्यमान संचालकांनीही आपले अर्ज भरले आहेत.

उद्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दाखल झालेल्या अर्जांची छाननी ११ एप्रिल रोजी होणार आहे.

या निवडणुकीत राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि संगमनेरचे नवनियुक्त आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून विरोधक उमेदवार उभे करणार असल्याने, निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या निवडणुका सहसा बिनविरोध होत आल्या आहेत. मात्र, यावेळेस बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली असून, अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. आत्तापर्यंत महिला मतदार संघ वगळता इतर सर्व मतदारसंघांमध्ये इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

 * साकुर गट: ४ अर्ज * जोर्वे गट: ९ अर्ज * तळेगाव गट: ४ अर्ज  * धांदरफळ गट: ८ अर्ज *  अकोले-जवळे गट: ५ अर्ज  * उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गट: २ अर्ज  * अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती प्रतिनिधी गट: १ अर्ज  * महिला प्रतिनिधी मतदार संघ: ० अर्ज  * इतर मागासवर्ग मतदार संघ: ४ अर्ज  * भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ: ३ अर्ज

यांनी दाखल केले उमेदवारी अर्ज…

साकुर गट – थोरात बाळासाहेब भाऊसाहेब, थोरात इंद्रजीत पंडितराव, वर्पे मीनानाथ गोपीनाथ, खेमनर इंद्रजीत अशोकराव,

जोर्वे गट – थोरात बाळासाहेब भाऊसाहेब, शेजुळ रामदास मुरलीधर, शिंदे पुंजाहारी तुकाराम, साबळे कारभारी भिका, दिघे गणपत उमाजी, दिघे दिनकर विठोबा, खुळे दत्तात्रय निवृत्ती, थोरात इंद्रजीत पंडितराव, शिंदे बाबासाहेब गजाबा,

तळेगाव गट – गोडगे संपतराव श्रीरंगराव, विलास रामराव, भोकनळ रवींद्र दगडू, कुटे रामनाथ बाळाजी,

धांदरफळ गट – ठकाजी नारायण कानवडे, घुले पांडुरंग दामोधर, ठकाजी नारायण कानवडे, रहाणे विजय रामनाथ, घुले पांडुरंग दामोधर, कासार विवेक विठ्ठल, गुंजाळ रमेश लहानुभाऊ, गुंजाळ रमेश लहानुभाऊ, भोकनळ रवींद्र दगडू

अकोले-जवळे गट – कडलग चंद्रकांत भिकाजी, देशमुख गुलाब सयाजी, देशमुख कैलास अण्णासाहेब, हासे माधव रामभाऊ

उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गटातून – थोरात बाळासाहेब भाऊसाहेब, थोरात विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब

अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती प्रतिनिधी गटातून – गंगाराम राधू वाकचौरे,

महिला प्रतिनिधी मतदार संघ – निरंक

इतर मागासवर्ग मतदार संघ – डाके धनंजय अशोकराव, अभंग सुदाम दत्तात्रय, खुळे दत्तात्रय निवृत्ती, ताजने अंकुश बाळासाहेब

भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ – शिंदे पुंजाहारी तुकाराम, भाबड बंडू दामू, खेमनर इंद्रजीत अशोकराव

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 4,327
उमेदवारी अर्ज थोरात कारखाना निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

सहकार क्षेत्रात आदर्श: थोरात कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर ५० किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

26/06/2026

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा (MACCIA) निवडणूक निकाल जाहीर: अहिल्यानगर जिल्ह्यातील तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड, पाहा राज्यातील सर्व विजयी उमेदवारांची यादी!

17/06/2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

By Annant Ppangarkar01/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  (विशेष प्रतिनिधी): संगमनेर शहरातील खांडेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका…

दारूच्या नशेत झालेल्या वादातून मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; संगमनेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

01/09/2026

महायुती सरकारचा मोठा निर्णय: भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश; संगमनेर, सिन्नर तालुक्यातील दुष्काळी ३५ गावांना दिलासा!

01/09/2026

आज मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

01/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.