Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

June 4, 2026

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध मद्य विक्री प्रकरणी अकोले तालुक्यात मोठी कारवाई; सात जणांवर गुन्हे दाखल, १ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

अवैध मद्य विक्री प्रकरणी अकोले तालुक्यात मोठी कारवाई; सात जणांवर गुन्हे दाखल, १ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत श्रीरामपूर आणि संगमनेर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांच्या पथकांचा सक्रिय सहभाग होता.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरMay 3, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – अकोले 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज (०३ मे) अकोले तालुक्यात अवैध मद्य विक्री करणाऱ्या केंद्रांवर मोठी कारवाई केली आहे. श्रीरामपूर येथील भरारी पथक क्र. २ आणि संगमनेर विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या या धडक कारवाईत सात ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून १ लाख ९ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाई करण्यात आलेले सुनील लक्ष्मण देशमुख, विक्रम अशोक घाटकर, राहुल अदालतनाथ शुक्ला, किसन सुरेश चोथवे, दत्तात्रेय दशरथ भालेराव, मुनीर जलाउद्दीन शेख आणि विकी ज्ञानदेव रहाणे (सर्व आरोपी रा. राजूर ता. अकोले, जि. अहिल्यानगर) येथील रहिवासी आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हिवरगाव आंबरे, विरगाव फाटा, तांभोळ, निळवंडे, निंब्रळ आणि राजूर या गावांमध्ये अवैध मद्य विक्रीची केंद्रे आणि ढाब्यांवर छापे टाकले. या कारवाईत एकूण २५८.१२ बल्क लिटर देशी दारू आणि १०.२६ बल्क लिटर विदेशी दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ९ हजार ८५० रुपये आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत वरील सर्व सातही आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सागर धोमकर (विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे), प्रमोद सोनोने (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहिल्यानगर), प्रवीणकुमार तेली (उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहिल्यानगर) यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली.

या कारवाईत श्रीरामपूर आणि संगमनेर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांच्या पथकांचा सक्रिय सहभाग होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यापुढेही अवैध हातभट्टी, गावठी दारू उत्पादन, वाहतूक, विक्री ठिकाणे आणि अवैध ढाब्यांवर सतत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,484
कारवाई राजुर राज्य उत्पादन शुल्क
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

संगमनेरमधील अवैध कत्तलखान्यांवर नगर परिषद व पोलिसांचा मोठा हातोडा; सात कत्तलखाने केले जमीनदोस्त

June 2, 2026

‘यासाठी’ वेदांत वाईन्सला नगरपरिषदेची नोटीस

June 2, 2026

संगमनेरमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून मोठे आवाज काढणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई, दुचाकी जप्त

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पत्रकारिता

“वाकचौरे आता थांबणार नाहीत…!” – एका विधानाने पेटलेली राजकीय चर्चा

By अनंत पांगारकरJune 4, 20260

संपादकीय अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील घडामोडी वेगाने बदलत आहेत.…

रोटरी क्लबच्या जयपूर फूट वितरण उपक्रमातून दिव्यांगांना स्वावलंबनाची नवी दिशा; संगमनेरमध्ये ११४ दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप

June 4, 2026

आज गुरुवार, ४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 4, 2026

संगमनेर पालिकेच्या कारवाई विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक; भाजीची पाटीच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नेत नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचे ‘गांधीगिरी’ आंदोलन

June 3, 2026

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.