Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कोट्यवधींच्या फसवणुकीचा गुन्हा; सरकारी योजनेच्या नावाखाली घातला गंडा
गुन्हेगारी

अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कोट्यवधींच्या फसवणुकीचा गुन्हा; सरकारी योजनेच्या नावाखाली घातला गंडा

पोलिसांनी तातडीने कारवाई करत अजय चौधरी आणि रविराज जोशी यांना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी बाळासाहेब नाहाटा अद्याप फरार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar05/05/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज –

सरकारी मॅग्नेट प्रोजेक्टच्या नावाखाली एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सलोखा असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मोठे पदाधिकारी अडचणीत आले आहेत.

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती बाळासाहेब ऊर्फ प्रवीणकुमार नाहाटा आणि गजनिया शेल्टर्स कंपनीचे संचालक अजय चौधरी यांच्या विरोधात पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ११ जणांची फसवणूक उघडकीस आली असून, फसवणुकीचा आकडा ९ कोटी ४९ लाख ३५ हजारांवर पोहोचला असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या संदर्भात राहुल रामराजे मक्तेदार (वय ४३, रा. शंकर कलाटेनगर, वाकड) यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रवीणकुमार बन्सीलाल नाहाटा (रा. ईशान्य सोसायटी, पुणे), अजय श्यामकांत चौधरी (रा. गजनिया गार्डन, पुणे) आणि रविराज गजानन जोशी (रा. सिंहगड रोड) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अजय चौधरी आणि रविराज जोशी यांना अटक केली आहे, तर मुख्य आरोपी बाळासाहेब नाहाटा अद्याप फरार आहेत.

फिर्यादी राहुल मक्तेदार, जे स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, त्यांची ओळख आरोपी अजय चौधरी याच्याशी त्यांच्या पत्नीच्या फर्निचर कंपनीच्या कामादरम्यान झाली. याच ओळखीमधून चौधरीने मक्तेदार यांना प्रवीणकुमार नाहाटा यांच्याशी ओळख करून दिली. नाहाटा यांनी मक्तेदार यांना महाराष्ट्र शासनाच्या मॅग्नेट (महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रोजेक्ट) योजनेची माहिती दिली. या योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले.

आरोपींनी मक्तेदार यांना सांगितले की, या योजनेत एक कृषी उत्पादक कंपनी स्थापन केली जाईल आणि त्यांना त्याचे संचालक बनवले जाईल. जर त्यांनी २० लाख रुपये गुंतवले, तर ७८ दिवसांनंतर त्यांना सरकारी योजनेनुसार ६० लाख रुपये परतावा मिळेल. यातील २६ लाख रुपये नाहाटा स्वतः घेणार होते, तर ५ लाख रुपये मध्यस्थी म्हणून अजय चौधरीला कमिशन मिळणार होते. उर्वरित ३० लाख रुपये मक्तेदार यांना परत देऊन त्यांचा राजीनामा घेतला जाईल, असे आरोपींनी सांगितले.

सुरुवातीला मक्तेदार यांनी या गुंतवणुकीस नकार दिला होता. मात्र, त्यावेळी नाहाटा यांनी आपण महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे सभापती असून त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. ही एक सरकारी योजना असल्याचे सांगून त्यांनी मक्तेदार यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मक्तेदार यांनी आपले दागिने मोडून या योजनेत पैसे गुंतवले.

दरम्यान, याच वेळी अजय चौधरी याने मक्तेदार यांच्याकडून पाचगणी येथील दांडेघर गावातील जमीन विकसित करण्याच्या नावाखाली १ कोटी ६० लाख रुपये हातउसने घेतले. हे पैसे एका महिन्यात परत करण्याचे आश्वासन त्याने दिले होते. मक्तेदार यांनी २७ नोव्हेंबर २०२४ रोजी ही रक्कम चौधरीला दिली होती. मात्र, जेव्हा मक्तेदार यांनी चौधरीने दिलेले धनादेश बँकेत जमा केले, तेव्हा ते वटवू नये असे निर्देश स्वतः चौधरीने बँकेला दिले होते. अशा प्रकारे या दोघांनी मिळून मक्तेदार यांची एकूण २ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केली.

या फसवणुकीबाबत मक्तेदार यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिक तपासात या फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येत असून, आणखी १० जणांची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. या फसवणुकीचा एकूण आकडा आता ९ कोटी ४९ लाख ३५ हजारांवर पोहोचला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिषा निंबाळकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,602
बाळासाहेब नहाटा राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
न्यायालय

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील बहुचर्चित खून प्रकरणात मुख्य आरोपी प्रकाश जाधव…

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.