Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गोवंश जनावरांची कत्तल टळली; संगमनेर पोलिसांनी केली कारवाई, एक ताब्यात
गुन्हेगारी

गोवंश जनावरांची कत्तल टळली; संगमनेर पोलिसांनी केली कारवाई, एक ताब्यात

यावेळी पोलिसांना एका खोलीत लहान-मोठी अशी एक लाख रुपये किमतीची एकूण १० काळ्या-पांढऱ्या रंगाची गोवंश जातीची जनावरे दाटीवाटीने बांधलेली आणि कोंडलेली आढळली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar08/05/2025Updated:09/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर

संगमनेर पोलिसांनी काल (०७ मे) शहरातील मदिनानगर परिसरात छापा टाकून कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेल्या एक लाख रुपये किमतीच्या १० गोवंश जनावरांची सुटका केली. या प्रकरणी जावेद इसाक शेख (वय २७, रा. संगमनेर खुर्द) या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी लगेचच कार्यालयातील पोलीस नाईक राहूल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांना माहिती मिळालेल्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले पोलीस नाईक राहुल डोके यांनी यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या आदेशानुसार पोलीस पथकाने मदिनानगरमधील दोषिया मजिदजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.

यावेळी पोलिसांना एका खोलीत लहान-मोठी अशी एक लाख रुपये किमतीची एकूण १० काळ्या-पांढऱ्या रंगाची गोवंश जातीची जनावरे दाटीवाटीने बांधलेली आणि कोंडलेली आढळली. त्यांना चारापाणी देण्यात आला नव्हता. त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने त्यांना तेथे ठेवण्यात आले होते. घटनास्थळी पोलीस कारवाईत हाती लागलेल्या जावेद शेख याने ही जनावरे आपली असून कत्तल करण्यासाठी बांधल्याची कबुली दिली.

पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून शेख याला ताब्यात घेतले आणि जनावरांना पुढील देखभालीसाठी संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील जिवदया गो शाळेत पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष बाचकर यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले असून पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) चे कलम ५, ९ आणि प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियमचे कलम ३, ११ अन्वये जावेद शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पारधी हे करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 9,178
कारवाई गोवंश कत्तल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026

पोलिसांचा वाळू माफियांना मोठा धक्का; या दोन तालुक्यातून २० लाखांचा मुद्देमाल जप्त

02/09/2026

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तरुणाला आमदार खताळ यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण; संदेश देशमुख यांच्यावर एनसी दाखल

01/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By Annant Ppangarkar03/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या…

आज गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026

संगमनेर सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल: प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तिघा आरोपींची २ वर्षांची सक्तमजुरी कायम

02/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.