Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मोठी कारवाई: १४ कोटींहून अधिक किमतीचा अल्प्राझोलम साठा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
गुन्हेगारी

मोठी कारवाई: १४ कोटींहून अधिक किमतीचा अल्प्राझोलम साठा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ म्हणून वर्गीकृत आहे आणि त्याच्या हाताळणी व वापरावर बंदी आहे. याचा उपयोग साधारणतः झोपेच्या गोळ्या बनवण्यासाठी केला जातो.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/05/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत १३ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपये किमतीचा तब्बल ४०८ किलो वजनाचा अल्प्राझोलम या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका टेम्पो चालकाला अटक केली असून पुणे जिल्ह्यातील एका रसायन अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी मिनीनाथ विष्णू राशिनकर (वय ३८, रा. धनगरवाडी, राहाता, अहिल्यानगर) या टेम्पो चालकाला अटक केली आहे. तर, विश्वनाथ कारभारी शिपणकर (रा. दौंड, पुणे) याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्याची ही पहिलीच घटना आहे.

यासंदर्भात माहिती अशी की, श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात एका लहान टेम्पोमधून अंमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाला शोध घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या. बुधवारी सायंकाळी पथकाने श्रीरामपूर एमआयडीसी आणि परिसरातील गावांमध्ये शोध मोहीम राबवली. त्यावेळी दिघी-खंडाळा रस्त्यावर एक छोटा हत्ती टेम्पो (एमएच २० बीटी ९५१) दिघीच्या दिशेने जाताना आढळला. पोलिसांनी या टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये १४ गोण्यांमध्ये पावडर आणि उर्वरित ७ गोण्यांमध्ये स्फटिकसदृश्य पदार्थ आढळून आले.”

पोलिसांनी टेम्पो चालक राशिनकर याची चौकशी केली असता, हे स्फटिक अल्प्राझोलम नावाचे औषध आहे आणि गोण्यांमधील पांढरी पावडर याच अल्प्राझोलमच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ असल्याने पोलिसांनी खात्री करण्यासाठी तातडीने अहिल्यानगर येथील न्यायवैद्यक तज्ज्ञांशी संपर्क साधला आणि त्यांना घटनास्थळी बोलावले. फॉरेन्सिक पथकाने केलेल्या प्राथमिक तपासणीत गोण्यांमधील पावडर आणि स्फटिक हे अल्प्राझोलम आणि त्याचा कच्चा माल असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी एकूण ६ कोटी ९७ लाख ६७ हजार रुपये किमतीचे ६९ किलो ७६७ ग्रॅम वजनाचे अल्प्राझोलमचे स्फटिक (७ गोण्या) आणि ६ कोटी ७६ लाख ७४ हजार रुपये किमतीचे ३३८ किलो ३७ ग्रॅम वजनाचे अल्प्राझोलम बनवण्याची पावडर (१४ गोण्या) जप्त केली. यासोबतच, १ लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो असा एकूण १४ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी टेम्पो चालक मिनीनाथ राशिनकर याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हा माल विश्वनाथ शिपणकर याने दिल्याचे सांगितले.

अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ म्हणून वर्गीकृत आहे आणि त्याच्या हाताळणी व वापरावर बंदी आहे. याचा उपयोग साधारणतः झोपेच्या गोळ्या बनवण्यासाठी केला जातो. पोलिसांनी आता हा माल नेमका कोठे तयार करण्यात आला, याचा तपास सुरू केला असल्याचे डॉ. शिवपुंजे यांनी म्हटले आहे. आरोपी विश्वनाथ शिपणकर यापूर्वी एका औषध कंपनीत काम करत हसण्याचे शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक निरीक्षक गणेश जाधव, उपनिरीक्षक रोशन निकम, रोहिदास ठोंबरे, दीपक मेढे, अंमलदार किरण मंडले, संपत बडे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातकडे, अजित पठारे, अकबर पठाण, अजिनाथ आंधळे, राहुल पोळ यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 857
अल्प्राझोलम पोलीस श्रीरामपूर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

By Annant Ppangarkar03/09/20260

Annant Ppangarkar मुंबई: माहिती अधिकाराचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे…

अहिल्यानगरमध्ये ४० नशेची इंजेक्शन्स जप्त; व्यायामपटूंकडून वापराचा संशय, तिघांना अटक

03/09/2026

अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ५.३० लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हे दाखल

03/09/2026

अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, २५.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

03/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.