Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » शिवसेनेच्या महिला नेत्यासह पतीविरोधात फसवणुकीचा गुन्हा: स्वस्त सोन्याच्या आमिषाने ४ लाखांना गंडा!
गुन्हेगारी

शिवसेनेच्या महिला नेत्यासह पतीविरोधात फसवणुकीचा गुन्हा: स्वस्त सोन्याच्या आमिषाने ४ लाखांना गंडा!

विद्याताई जावेद गाडेकर आणि जावेद यासीन पठाण यांच्याविरोधात फसवणूक, मारहाण, धमकी आणि सामूहिक सहभाग अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – 

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेटच्या मॅनेजरला चार लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी शेवगाव येथील शिवसेनेच्या नवप्रविष्ट महिला नेत्या विद्याताई जावेद गाडेकर आणि त्यांचे पती जावेद यासीन पठाण यांच्याविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण… अतुल नामदेव अटकळे (वय ३७, रा. जुना ठाणे शहर), रिलायन्स कॉर्पोरेटचे मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ डिसेंबर २०२० रोजी जावेद यासीन पठाणने अटकळे यांना त्यांच्या विद्यानगर येथील घरी बोलावले. त्यावेळी त्यांची पत्नी विद्या गाडेकरही उपस्थित होत्या. पठाणने त्यांना घरातील चैतन्य कानिफनाथ मढी यांच्या गादीचे दर्शन घ्यायला लावले आणि घरातील सोन्याचे दागिने दाखवून आपला सोने विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असल्याने इतरांना कमी दरात शुद्ध सोने विकून फायदा करून दिला आहे. जास्तीत जास्त पैशांची गुंतवणूक केल्यास कमी दरात सोने देईन, असे आश्वासन त्याने अटकळे यांना दिले.

४ लाखांची फसवणूक… या आमिषाला बळी पडून अतुल अटकळे यांनी १५ जानेवारी २०२१ रोजी २ लाख रुपये आणि २३ जानेवारी २०२१ रोजी आणखी २ लाख रुपये असे एकूण ४ लाख रुपये IMPS द्वारे गाडेकर यांच्या खात्यावर वर्ग केले. मात्र, त्यानंतर दोघांनीही सांगितल्याप्रमाणे शुद्ध सोने दिले नाही. कोविडमुळे अटकळे यांना शेवगावला येता आले नाही. या काळात त्यांनी वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन घेतले नाहीत आणि टाळाटाळ केली. गुंतवणूक केलेले पैसेही परत केले नाहीत. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. पैसे परत मागितल्यावर “तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करू आणि जेलमध्ये टाकू” अशी धमकीही दिल्याचे अटकळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

गुन्हा दाखल… या प्रकरणी विद्याताई जावेद गाडेकर आणि जावेद यासीन पठाण यांच्याविरोधात फसवणूक, मारहाण, धमकी आणि सामूहिक सहभाग अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,110
फसवणूक गुन्हा स्वस्तात सोने
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- तणावग्रस्त जीवनशैलीच्या काळात लोकांना हसवणे हे सर्वात मोठे पुण्याचे…

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.