Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ससेहोलपट: थोरातांच्या ऐतिहासिक ‘शाळांमधून दाखले’ योजनेची पुन्हा अंमलबजावणीची मागणी
शिक्षण

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ससेहोलपट: थोरातांच्या ऐतिहासिक ‘शाळांमधून दाखले’ योजनेची पुन्हा अंमलबजावणीची मागणी

थोरात यांनी महसूल विभागाला अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक बनवण्यासाठी 'सुवर्ण राजस्व अभियान' सुरू केले. या अभियानांतर्गत अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या, ज्यात 'शाळांमधून दाखले वाटप' हा एक महत्त्वाचा उपक्रम होता.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/05/2025Updated:27/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर, अनंत पांगारकर
दहावी, बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी सध्या विद्यार्थी आणि पालकांची मोठी धावपळ सुरू आहे. उत्पन्न, जात, अधिवास, नॉन क्रिमीलेअर यांसारख्या दाखल्यांसाठी त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २०१३ मध्ये सुरू केलेल्या “शाळेतूनच दाखले वाटप” योजनेची आठवण पालकांना होत आहे. थोरातांच्या दूरदृष्टीने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा ठरला होता आणि आता तो पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
थोरातांचा ऐतिहासिक निर्णय आणि त्याचे फायदे… २०१३ मध्ये महसूल मंत्री असताना, बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक बनवण्यासाठी ‘सुवर्ण राजस्व अभियान’ सुरू केले. या अभियानांतर्गत अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या, ज्यात ‘शाळांमधून दाखले वाटप’ हा एक महत्त्वाचा उपक्रम होता. विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी अधिवास, जात, नॉन-क्रिमीलेअर यांसारखे महत्त्वाचे दाखले थेट शाळांमधूनच वाटप करण्यास सुरुवात केली. या उपक्रमांतर्गत तत्कालीन काळात सुमारे ८० लाख विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले होते, ज्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्येही झाली होती.
या योजनेमुळे विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांमध्ये जाण्याची गरज टळली, वेळेची बचत झाली आणि दाखले मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी व जलद झाली. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना याचा मोठा फायदा झाला, कारण त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन दिवसभर रांगेत उभे राहावे लागत नव्हते.
सध्याची परिस्थिती आणि पालकांची मागणी… सध्या दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले असून, अकरावी आणि इतर उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. ऑनलाईन प्रवेशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व्हर वारंवार बंद पडणे, वेळेत दाखले न मिळणे यामुळे विद्यार्थी आणि पालक संभ्रमावस्थेत आहेत. आज अनेक पालक बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळातील त्या निर्णयाची आठवण करून देत आहेत.
थोरातांच्या नेतृत्वाखालील या अभियानामुळे केवळ दाखल्यांचे वाटपच सोपे झाले नाही, तर ऑनलाईन सातबारा, फेरफार अदालत, संगणकाद्वारे मोजणी, आणि पाणंद रस्ते यांसारख्या योजनांमुळे महसूल विभागाच्या कामात पारदर्शकता, गतीमानता आणि आधुनिकता आली. मात्र, सत्ता बदलल्यानंतर ही महत्त्वपूर्ण योजना पूर्णपणे बंद पडली आहे.
सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय पाहता, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या या ऐतिहासिक योजनेची पुन्हा अंमलबजावणी करावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि प्रवेश प्रक्रियेतील त्यांची धावपळ कमी होईल.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दाखले मिळवण्यासाठी संगमनेरला यावे लागत आहे आणि तेथेही दाखले लवकर मिळत नाहीत. थोरात साहेबांनी सुरू केलेला शाळेत दाखले देण्याचा निर्णय पुन्हा सुरू करावा. – राजेंद्र कहांडळ, देवकौठे

बाळासाहेब थोरात हे ग्रामीण भागातील आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारे नेते असल्याचे सांगत, त्यांनी सुरू केलेल्या विद्यार्थी हिताच्या सुविधा पुन्हा सुरू केली पाहिजेत. – ज्योतीताई शेवकर

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,117
ॲडमिशन बाळासाहेब थोरात शाळांमधून दाखले योजना सुवर्ण जयंती राजस्व अभियान
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एक फोन आणि सोयाबीनला ४ हजार रुपयांची मदत; दुष्काळात शेतकऱ्यांना जाणवू लागली अनुभवी नेतृत्वाची उणीव

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

By Annant Ppangarkar11/10/20260

प्रवीण पुरो – देश एका वेगळ्या वळणावर असताना, या देशाचं सार्वभौमत्व संकटात आणणाऱ्या सरकारला आणि…

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.