Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

16/10/2026

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मद्यधुंद कारचालकाने १२ एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांना उडवलं, तिघांची प्रकृती गंभीर
अपघात

मद्यधुंद कारचालकाने १२ एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांना उडवलं, तिघांची प्रकृती गंभीर

पुण्यात अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिवस-रात्र अभ्यास करणारे हे विद्यार्थी या दुर्दैवी घटनेचे बळी ठरले आहेत. सदाशिव पेठ हा पुण्यातील असा भाग आहे जिथे अनेक अभ्यासिका आहेत आणि शेकडो विद्यार्थी येथे राहून अभ्यास करतात.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
पुणे – 
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत शनिवारी सायंकाळी एका मद्यधुंद कारचालकाने अक्षरशः धुमाकूळ घालत १२ जणांना उडवले. या भीषण अपघातात जखमी झालेले सर्वजण MPSC परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही धक्कादायक घटना भावे हायस्कूलजवळ, श्री साईनाथ अमृततुल्य चहाच्या दुकानाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अनेक विद्यार्थी दिवसभर अभ्यासिकांमध्ये अभ्यास करून चहा पिण्यासाठी भावे हायस्कूलजवळच्या चहाच्या टपरीवर थांबले होते. याचवेळी जयराम मुले (वय २७, रा. बिबवेवाडी) नावाच्या चालकाने भरधाव वेगात आपली कार (पर्यटक टॅक्सी) चालवत आणली. प्राथमिक अंदाजानुसार, तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेल्या कारने चहाच्या टपरीसमोर उभ्या असलेल्या लोकांवर आणि त्यांच्या पार्क केलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली.
या अपघातात एकूण १२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी चालक जयराम मुले याला, तसेच वाहन मालक दिगंबर यादव शिंदे (वय २७) आणि सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पुण्यात अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिवस-रात्र अभ्यास करणारे हे विद्यार्थी या दुर्दैवी घटनेचे बळी ठरले आहेत. सदाशिव पेठ हा पुण्यातील असा भाग आहे जिथे अनेक अभ्यासिका आहेत आणि शेकडो विद्यार्थी येथे राहून अभ्यास करतात. उद्या रविवारी या विद्यार्थ्यांची एमपीएससीची परीक्षा होती. मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात ही घटना घडल्याने विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,190
अपघात एमपीएससी परीक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

माजी खासदारावर गुन्हा दाखल

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

वय विसरले अन् झिंगाटवर थिरकले! ४० वर्षांनंतर भेटले सेवानिवृत्त शिक्षक मित्र; भंडारदऱ्यातील भाऊक ‘गेट-टुगेदर’ची खास बातमी

By Annant Ppangarkar16/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या युनियन अध्यापक विद्यालयातून सन १९८४ ते १९८६ च्या वर्गातून बाहेर…

आदिवासी बांधवांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश! आमदार खताळ सोडविणार शिरसगाव धुप्याचा पाणी, रस्ते, वीज प्रश्न

16/10/2026

घारगाव बहुचर्चित खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! मुख्य आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय… न्यायालयीन युक्तिवादात काय घडले वाचा सविस्तर

16/10/2026

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.