Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 20, 2026

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू; शिक्षक वडील अटकेत
गुन्हेगारी

सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू; शिक्षक वडील अटकेत

घाबरलेल्या वडिलांनी तिला सांगली येथील दवाखान्यात नेले, जिथे त्यांनी ती बाथरूममध्ये पडून जखमी झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरJune 23, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज- 

१२ वीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. साधना धोंडिराम भोसले असे मृत मुलीचे नाव असून, या प्रकरणी शिक्षक असलेले तिचे वडील धोंडिराम भगवान भोसले यांना खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेलकरंजी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक असलेले धोंडिराम भोसले यांची मुलगी साधना १० वी मध्ये ९२.६०% गुण मिळवून शाळेत पहिली आली होती. तिला डॉक्टर बनवण्याचे कुटुंबीयांचे स्वप्न होते आणि त्यासाठी तिची खासगी शिकवणी सुरू होती. नुकत्याच झालेल्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडील धोंडिराम चिडले होते.

शुक्रवारी रात्री (२१ जून) धोंडिराम यांनी साधनाला कमी गुणांबद्दल विचारणा केली. त्यावेळी साधनाने “पप्पा, तुम्हालाही कमीच गुण मिळत होते. तुम्ही काय कलेक्टर झालात का? शिक्षक झालाच ना?” असे उलट उत्तर दिले. यावर धोंडिराम यांचा राग अनावर झाला. त्यांनी घरात असलेल्या दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला बेदम मारहाण केली आणि पोटात लाथाही घातल्या. पत्नीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नंतरही अनेकवेळा साधनाला मारहाण केली.

या मारहाणीत साधनाच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. ती अस्वस्थ होती, तरी तिला शनिवारी दवाखान्यात नेण्यात आले नाही. शनिवारी दुपारी घरी परतल्यावर साधना बेशुद्ध अवस्थेत आढळली. घाबरलेल्या वडिलांनी तिला सांगली येथील दवाखान्यात नेले, जिथे त्यांनी ती बाथरूममध्ये पडून जखमी झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.

शवविच्छेदनातून साधनाच्या शरीरावर मारहाणीचे अनेक व्रण आढळून आले, ज्यामुळे पोलिसांना संशय आला. चौकशीनंतर हा प्रकार उघडकीस आला. मृत मुलीची आई प्रीती भोसले यांनी आपल्या पतीविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी धोंडिराम भोसले यांना अटक केली असून, त्यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,237
खून हत्या
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

कोतुळमध्ये ६ लाखांचा गुटखा व कार जप्त; पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची मोठी कारवाई

July 17, 2026

जिओ पेट्रोल पंपाच्या नावाखाली अहिल्यानगरच्या व्यावसायिकाला ८४ लाखांचा गंडा

July 16, 2026

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज, सोमवार २० जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

By अनंत पांगारकरJuly 20, 20260

आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि शुभ फलदायी राहील. कामाच्या ठिकाणी…

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

July 19, 2026

अतिक्रमणाच्या नावाखाली संगमनेरात गरिबांवर बुलडोझर, धनदांडग्यांवर मेहेरनजर; ‘सिंघम’ बनलेल्या प्रशासनाविरोधात नागरिकांचा संतप्त सवाल

July 19, 2026

रविवार विशेष लेख — सोनमजी, तुम्ही देशाला हवे आहात!

July 19, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.