Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरात पहाटे छापा: गोवंश हत्याकांडाचा पर्दाफाश, १२ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त! आमदारांच्या प्रश्नानंतर संगमनेर पोलीस ॲक्शनमध्ये; तिघे आरोपी फरार
गुन्हेगारी

संगमनेरात पहाटे छापा: गोवंश हत्याकांडाचा पर्दाफाश, १२ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त! आमदारांच्या प्रश्नानंतर संगमनेर पोलीस ॲक्शनमध्ये; तिघे आरोपी फरार

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्याने, या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, ०९ जुलै २०२५- प्रतिनिधी: 

संगमनेर शहरात पहाटेच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गोवंश हत्याकांडाचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत लाखो रुपयांचे गोमांस आणि हत्यारं जप्त करण्यात आली असून, तिघे आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले आहेत. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्याने, या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास तीनबत्ती चौकात थांबलेल्या पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना या अनुषंगाने माहिती मिळाली होती. संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरातील गल्ली नंबर ५ येथील फैजु फारुक कुरेशी यांच्या पत्र्याच्या वाड्यात कमरअली गुलाम जिलानी सौदागर आणि शहबाज बुटन कुरेशी हे गोवंश जनावरांची कत्तल करत आहेत. ही माहिती मिळताच, सोनवणे यांनी तात्काळ याची माहिती आपल्या पथकाला देत कारवाईसाठी बोलावून घेतले. पोलीस नाईक राहुल कचरु डोके, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कडलग, आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे त्यांचे पथक तात्काळ तीनबत्ती चौकात आले.

पथकाने मिळालेल्या माहितीनुसार, फैजु फारुक कुरेशी यांच्या वाड्यावर छापा टाकला असता, तिथे एक व्यक्ती गोवंश कत्तल करताना, तर दुसरा कत्तल केलेले गोमांस चारचाकी वाहनात भरताना आढळून आला. पथकाने तात्काळ संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग आणि अंमलदार यांना दोन पंचांसह घटनास्थळी बोलावले.

पोलिसांना पाहताच आरोपी कमरअली गुलाम जिलानी सौदागर आणि शहबाज बुटन कुरेशी यांनी अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते फरार होण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता, सदर वाडा फैजु फारुक कुरेशी यांचा असल्याचे समोर आले.

घटनास्थळाची आणि वाहनाची पाहणी केली असता, मोठ्या प्रमाणात गोमांस आणि गोमांसाचे अनावश्यक अवयव आढळून आले. तसेच, एक कोयता, एक लोखंडी हुक असलेला वजन काटा, आणि पळून गेलेल्या आरोपींच्या चपलाही जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये अंदाजे रु. ५,००,०००/- किमतीची महिंद्रा झायलो (एमएच ०२ बीएम १५०३) गाडी, रु. ७,५०,०००/- किमतीचे अंदाजे २५०० किलो गोमांस आणि अवयव, एक लोखंडी कोयता, आणि रु. ५,०००/- किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा यांचा समावेश आहे. एकूण रु. १२,५५,०००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे.

या संदर्भात पोलीस नाईक राहुल डोके यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डोके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कमरअली गुलाम जिलानी सौदागर, शहबाज बुटन कुरेशी (दोघे रा. जमजम कॉलनी, संगमनेर) आणि त्यांना जागा व लाईटची सुविधा उपलब्ध करून देणारा फैजु फारुक कुरेशी (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) या तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २७१, ३२५, ३(५) सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन १९९५ (सुधारित २०१५) कलम ५, ५ (क), ९, ९ (अ) सह आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,012
कत्तलखाना छापा कारवाई कुणाल सोनवणे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.