Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये गटारात गुदमरून दोघांचा मृत्यू: निष्काळजीपणाचा आरोप, प्रतिष्ठित ठेकेदार आर. एम. कातोरेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये गटारात गुदमरून दोघांचा मृत्यू: निष्काळजीपणाचा आरोप, प्रतिष्ठित ठेकेदार आर. एम. कातोरेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुख्य ठेकेदार मे. आर. एम. कातोरे अँड कंपनीचे रामहरी मोहन कातोरे आणि निखिल रामहरी कातोरे (दोघे रा. गोविंद नगर, संगमनेर) तसेच बी. आर. क्लिनिंगचे ठेकेदार मुश्ताक बशीर शेख (रा. शिवाजीनगर, संगमनेर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर शहरात सांडपाणी प्रकल्पाच्या भूमिगत गटार साफसफाई दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत एका कर्मचाऱ्यासह स्थानिक तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी संगमनेर नगरपालिकेच्या एसटीपी प्रकल्पाचे मुख्य ठेकेदार मे. आर. एम. कातोरे अँड कंपनी आणि बी. आर. क्लिनिंगचे ठेकेदार अशा तिघांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी कोल्हेवाडी रोडवरील गटार साफसफाईचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली होती. गटारात उतरलेल्या अतुल रतन पवार (वय १९, रा. संजय गांधीनगर, संगमनेर) या कर्मचाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज जावेद पिंजारी (वय २१, रा. मदिनानगर, संगमनेर) हा तरुणही गटारात गुदमरला आणि त्याचाही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी संगमनेर नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अमजद बशीर पठाण यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मध्यरात्री एक वाजता फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, एसटीपी प्लांटचे मुख्य ठेकेदार मे. आर. एम. कातोरे अँड कंपनीचे रामहरी मोहन कातोरे आणि निखिल रामहरी कातोरे (दोघे रा. गोविंद नगर, संगमनेर) तसेच बी. आर. क्लिनिंगचे ठेकेदार मुश्ताक बशीर शेख (रा. शिवाजीनगर, संगमनेर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदारांनी नगरपालिकेशी केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केले आहे. एसटीपी प्लांटच्या भूमिगत गटारींच्या साफसफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही योग्य ती काळजी घेतली नाही. तसेच, आरोग्य विभागाची पूर्वपरवानगी न घेता आणि आवश्यक सुरक्षा साधनांशिवाय मजुरांना गटारात उतरवले. यामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही निष्काळजीपणाचे कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या घटनेमुळे शहरातील कामाच्या पद्धतींबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०५, १२५(अ), १२५(ब), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात रामहरी कातोरे पिता-पुत्रांसह बी. आर. क्लिनिंगचे ठेकेदार शेख यांना अटक होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,086
कातोरे गुन्हा मृत्यू
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेसहा लाखांचा गुटखा जप्त, संगमनेरातील दोघांसह चार जणांवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे…

संगमनेरातील ‘या’ मुख्य रस्त्याचे नशीब बदलणार! आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश; १० कोटींचा मोठा निधी मंजूर

17/10/2026

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे नवरात्रोत्सवातील दांडिया कार्यक्रमादरम्यान तुफान राडा; दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी गुन्ह्यांत लोखंडी रॉड, चाकू आणि फायटरने जीवघेणा हल्ला

17/10/2026

महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा ठरला फोल; संगमनेर कोर्टाकडून सर्व ५ आरोपींची निर्दोष मुक्तता!

17/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.