Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर गटार दुर्घटना: पवार कुटुंबाला ३० लाखांची मदत, पिंजारी कुटुंबालाही भरीव मदतीचे आमदार खताळांचे आश्वासन
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेर गटार दुर्घटना: पवार कुटुंबाला ३० लाखांची मदत, पिंजारी कुटुंबालाही भरीव मदतीचे आमदार खताळांचे आश्वासन

शासन दरबारी दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर शहरातील भूमिगत गटार दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ३० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी आमदार खताळ यांनी मदतीचे आश्वासन देतानाच, या घटनेतील दुसरा मृत रियाज जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांनाही शासनाच्यावतीने भरीव मदत मिळवून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

शनिवारी आमदार खताळ यांनी मदिनानगर येथील जावेद पिंजारी आणि संजय गांधीनगरमधील रतन पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. 

संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटाराच्या चेंबरमधील मैला काढताना अतुल पवार याचा मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना रियाज पिंजारी यालाही जीव गमवावा लागला होता तर या घटनेत आणखी दोघेजण जखमी झाले होते.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच, आमदार खताळ यांनी तात्काळ नगरपालिका मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

आमदार खताळ यांनी सांगितले की, अतुल पवार यांच्या कुटुंबाला मिळालेली मदत आणि रियाज पिंजारी यांच्या कुटुंबीयांनाही भरीव स्वरूपाची मदत कशी देता येईल, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. शासन दरबारी दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारास लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी मयत तरुणांच्या नातेवाईकांनी खताळ यांच्याकडे केली. यावर बोलताना खताळ यांनी, गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, अटक होणारच आहे. कितीही जामिनासाठी प्रयत्न केले तरी कायद्यापासून कोणीही पळू शकणार नाहीत.खताळ यांच्यासोबत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,014
अमोल खताळ गटार दुर्घटना मदत पत्र सांत्वन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

माहिती अधिकाराचे प्रणेते अण्णा हजारे यांची मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी घेतली सदिच्छा भेट; प्रकृतीची केली विचारपूस

03/09/2026

जवळेकडलगच्या दुर्देवी घटनेनंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची पवार कुटुंबाला सांत्वन भेट; बिबट्यांच्या दहशतीवर प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी

02/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: आगामी गणेशोत्सव भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार…

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.