Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

08/09/2026

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद
गुन्हेगारी

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

ताब्यात घेतलेल्या दोन्ही महिलांकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीची तांब्या-पितळेची भांडी व चोरीचे साहित्य जप्त केले असून, फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/07/2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा:
हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा बनाव करत बंद घरांची रेकी करून घरफोडी करणाऱ्या एका अट्टल टोळीचा आळेफाटा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सतर्क नागरिकांच्या मदतीने दोन महिलांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आळेखिंड परिसरातील समाधान हॉटेलच्या मागील भागात दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. संतवाडी शिवारात राहणाऱ्या भामाबाई सोनभाऊ निमसे यांचे घर बंद असल्याचे पाहून ३ महिला व १ पुरुष अशा चार जणांच्या टोळीने दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला. घरातील जुनी तांब्या-पितळची भांडी आणि पाण्याचा बंब त्यांनी आणलेल्या पोत्यात भरण्यास सुरुवात केली.
दरम्यान, बंद घरातून संशयास्पद आवाज आल्यामुळे भामाबाईंना संशय आला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, कचरा वेचण्याच्या बहाण्याने आलेल्या महिला घरातील सामान चोरताना दिसल्या. भामाबाईंनी तत्काळ आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले. नागरिकांनी पाठलाग करून दोन महिलांना गनिमी काव्याने पकडले, तर एक महिला आणि एक पुरुष पसार होण्यात यशस्वी झाले.
हे आरोपी जुन्नर तालुक्यातील सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संशय येऊ नये म्हणून हातात रिकाम्या बाटल्या घेऊन फिरायचे आणि बंद घर दिसताच लोखंडी हत्याराने दरवाजा तोडून चोरी करायची, असा यांचा फंडा होता. आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही महिलांकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीची तांब्या-पितळेची भांडी व चोरीचे साहित्य जप्त केले असून, फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 597
आळेफाटा पोलीस रेकी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीची छापेमारी: १७०० किलो गोमांसासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना पकडले!

05/09/2026

संगमनेर बस स्थानक परिसरात कारवाई; एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या तरुणासह २ लाख ७ हजारांच्या मुद्देमाल पकडला

04/09/2026

राजहंस मिल्क पार्लर चोरी प्रकरण: संगमनेर पोलिसांकडून अवघ्या काही तासांत दोन चोरट्यांना बेड्या

04/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
क्रिडा व कला

जयहिंद कला महोत्सव: १२ हजार विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar08/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या…

कौठे मलकापूरच्या औद्योगिक प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल? ‘MIDC’ की केवळ औद्योगिक वसाहत; सत्तेतील दोन्ही आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी : अमोल शेलकर

08/09/2026

आज मंगळवार, ०८ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

08/09/2026

राजापूर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती रद्द करण्याची नागरिकांची मागणी

07/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.