Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री बाळासाहेब थोरातांकडून पवार आणि पिंजारी कुटुंबीयांना मदतीचं आश्वासन, पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही बोट
महाराष्ट्र संवाद विशेष

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांकडून पवार आणि पिंजारी कुटुंबीयांना मदतीचं आश्वासन, पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही बोट

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही या घटनेसाठी नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं म्हटलं.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त 

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर येथील भूमिगत गटार दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या अतुल पवार आणि जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी भेट घेऊन सांत्वन केलं. या दोन्ही कुटुंबांना सरकारकडून तातडीने आणि जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन थोरात यांनी दिलं.

कोल्हेवाडी रोड येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर थोरात यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, नितीन अभंग, निखिल पापडेजा, गणेश मादास, जावेद पठाण, लाला बेपारी, अंबादास आडेप, वैष्णव मुर्तडक, किशोर टोकसे यांच्यासह शहरातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडली दुर्घटना

थोरात म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे. काम अपूर्ण असताना या युवकांना स्वच्छतेसाठी पाठवण्याची खरंच गरज नव्हती. ही घटना हृदय हेलावणारी असून, अतुलला वाचवण्यासाठी जावेद पुढे सरसावला आणि दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला, असं त्यांनी नमूद केलं. या दोन्ही कुटुंबांना शासन स्तरावरून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारकडे आपण पाठपुरावा करून तातडीने मदत मिळवून देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही या घटनेसाठी नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं म्हटलं. काम अपूर्ण असताना ही जोडणी करायला नको होती, असं ते म्हणाले. या घटनेचं राजकारण न करता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या कुटुंबांना जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल, असं तांबे यांनी स्पष्ट केलं. डॉ. जयश्री थोरात यांनीही दोन्ही कुटुंबांतील महिलांचं सांत्वन केलं.

यावेळी  कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,349
गटार दुर्घटना जयश्री थोरात बाळासाहेब थोरात सांत्वन सुधीर तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्याला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा; मानवता हाच खरा धर्म: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

05/09/2026

वर्गणीवरून व्यापाऱ्याला मारहाण; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठेत खळबळ, पोलीस तक्रारीविना चर्चेला उधाण

05/09/2026

संगमनेरमध्ये लोड शेडिंगविरोधात काँग्रेस आक्रमक; सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणकडे मागणी

05/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर: आगामी गणेशोत्सव भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार…

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026

आज बुधवार, ०९ सप्टेंबर २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

09/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.