Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दिव्यांग भवनाचे काम लवकरच सुरू होणार – आमदार अमोल खताळ
राजकारण

दिव्यांग भवनाचे काम लवकरच सुरू होणार – आमदार अमोल खताळ

शिबिरात १२७ दिव्यांग बांधवांनी नोंद केली होती. त्यापैकी ८२ जणांना कॅलिपर्स मंजूर झाले होते, ज्यातून ७२ जणांना कॅलिपर्स आणि ४१ दिव्यांग बंधू-भगिनींना प्रमाणपत्राचे वाटप आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर शहरात दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या दिव्यांग भवनाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची व त्यासाठी नगरपालिकेने नेहरू गार्डनजवळ दिव्यांग भवनासाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. 

गणेशनगर येथील नगरपालिका योग भवनात आयोजित एका कार्यक्रमात आमदार खताळ यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात-पाय, कॅलिपर्स आणि दिव्यांग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, डॉ. संदीप कचोरिया, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, आरपीआयचे शहर प्रमुख कैलास कासार, जालिंदर लहामगे यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार खताळ यांनी आपल्या राजकीय प्रवासात संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांग बांधवांच्या गरजांची ओळख झाल्याचे सांगितले. तसेच, केंद्र सरकारच्या माध्यमातून माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ‘वयोश्री’ योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवल्याचे नमूद केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य अधिक गतिमानतेने सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शासनाच्या योजना पारदर्शकपणे राबवल्या जात असून, कोणत्याही कामासाठी पैसे न देण्याचे आवाहन त्यांनी केले. आपले आणि पालकमंत्री विखे पाटील यांचे कार्यालय, तसेच ‘विळद फाउंडेशन’ नेहमीच दिव्यांग बांधवांसाठी खुले राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत शिबिरात १२७ दिव्यांग बांधवांनी नोंद केली होती. त्यापैकी ८२ जणांना कॅलिपर्स मंजूर झाले होते, ज्यातून ७२ जणांना कॅलिपर्स आणि ४१ दिव्यांग बंधू-भगिनींना प्रमाणपत्राचे वाटप आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार खताळ यांनी दिव्यांग बांधवांना विश्वास दिला की, अडचणीच्या वेळी आपला भाऊ आणि मुलगा म्हणून ते २४ तास पाठीशी उभे राहतील.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 642
अमोल खताळ कृत्रिम साहित्य वाटप दिव्यांग भवन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.