Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
राजकारण

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन शेतकरी भवन व उपहारगृहाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

राहुरी:

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिली. 

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन शेतकरी भवन व उपहारगृहाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार काशीनाथ दाते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या नफ्यात व काटकसरीने चालवण्यावर भर दिला. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे उत्पादन वाढवण्याचे, फळबाग लागवडीचे आणि शाश्वत शेती पद्धतीचे अवलंबन करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. नवीन पिढीने पर्यावरणपूरक व कचरामुक्त शहर उभारणीत पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी २० लाख घरे मंजूर झाली असून, त्यांच्या बांधकामासाठी ५ ब्रास वाळू मोफत दिली जात आहे. ‘लाडकी बहीण योजने’साठी ४५ हजार कोटींची तरतूद असून, अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील भगिनींनाच याचा लाभ मिळेल. नोकरदार कुटुंबांतील सदस्यांनी या योजनेचा लाभ न घेण्याचे आवाहन केले.

राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी २० हजार कोटी रुपये, तर शून्य टक्के व्याजदराने ३ लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. शेतकरी कल्याणासाठी दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करून पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दिव्यांग लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मासिक मानधन दीड हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये करण्यात आले आहे. कांद्याच्या खरेदीसाठी नाफेडमार्फत आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, शासनाला राज्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत कर्ज घेण्याची मुभा आहे. देशाच्या एकूण जीएसटीपैकी महाराष्ट्राचा वाटा १६ टक्के असून, त्यातील ८ टक्के वाटा राज्याला मिळतो.

पुणे – अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गास केंद्र शासनाने मंजुरी दिली असून, भूसंपादन करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल, असेही पवार यांनी नमूद केले. यामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा कार्यान्वित झाली असून, सुसज्ज टर्मिनललाही मंजुरी मिळाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाविक शिर्डीला भेट देऊ शकतील, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचे कौतुक करताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ही बाजार समिती राज्यातील पहिल्या दहा उत्कृष्ट बाजार समित्यांमध्ये समाविष्ट आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 483
अजित पवार राहुरी बाजार समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मजबुरी का नाम मोदी, मजबुती का नाम महात्मा गांधी!

02/10/2026

आमदार अमोल खताळ शेतकऱ्यांच्या बांधावर; पिकांसंदर्भात अधिकाऱ्यांना या सूचना

01/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर येथून नगर-मनमाड रस्त्याने भिवंडी येथे बेकायदेशीरपणे विक्रीसाठी नेण्यात येणारा सुगंधीत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.