Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरवापर, अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीचे आदेश
राजकारण

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैरवापर, अपात्र लाभार्थ्यांकडून वसुलीचे आदेश

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि शासनाची दिशाभूल करून घेतलेली रक्कम वसूल करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar01/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त

मुंबई, विशेष प्रतिनिधी:

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. या योजनेचा लाभ सरकारी सेवानिवृत्त महिलांसह हजारो पुरुषांनी घेतल्याचं उघड झालं आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.

या योजनेत सुमारे ४ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. यावरून विरोधक सरकारवर चांगलेच आक्रमक झाले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवर सविस्तर चर्चा झाली. ज्या पुरुषांनी योजनेचा चुकीचा फायदा घेतला आहे, त्यांची चौकशी करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

२६ लाखांपेक्षा जास्त अपात्र लाभार्थी- माहिती तंत्रज्ञान विभागाकडून या योजनेतील लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. यामध्ये तब्बल २६ लाख ३४ हजार लाभार्थी अपात्र असूनही त्यांना योजनेचा लाभ मिळाल्याचं समोर आलं आहे. या सर्व अपात्र लाभार्थ्यांचा लाभ आता थांबवण्यात आला आहे.

या अपात्र लाभार्थ्यांमध्ये काही पुरुषांचाही समावेश आहे. या पुरुष लाभार्थ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या घरात विकलांग किंवा इतर कारणांमुळे महिलेच्या नावावर खाते नसल्यास आणि महिलेचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले असल्यास, त्याचीही पडताळणी केली जाईल. ज्या प्रकरणांमध्ये पुरुष दोषी आढळतील, त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल.

महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि शासनाची दिशाभूल करून घेतलेली रक्कम वसूल करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 835
आदिती तटकरे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुप्रिया सुळे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

संगमनेर आगारात ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसेस, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण; लोकार्पण कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थितांकडून श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

By Annant Ppangarkar10/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठ्या असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांचे जाळे अधिक भक्कम…

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

आमदार अमोल खताळ यांनी वेधले ऊर्जा राज्यमंत्र्यांचे लक्ष; मेंढवन उपकेंद्राचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी

10/10/2026

शनिवार १० ऑक्टोंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.