Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटायला लागले’, अजित पवार संतप्त
राजकारण

कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटायला लागले’, अजित पवार संतप्त

जो तो उठतो आणि मला उपदेश करतो. सगळा मक्ता मीच घेतला आहे. यांनी केवळ उपदेश करायचा.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

पुणे: कुणीही उठतो आणि उपदेश करतो, सगळा मक्ता मीच घेतला आहे. कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटायला लागले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये मुळा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पासाठी झाडे तोडण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून ते चिडले. पर्यावरणप्रेमींनी पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी ही वृक्षतोड थांबवावी अशी मागणी केली होती, त्यावर त्यांनी हे विधान केले.

चिंचवडमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाच्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केला. भापकर यांनी पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या सुशोभीकरण प्रकल्पांत हजारो झाडे तोडण्यात येत असल्याकडे लक्ष वेधले आणि पालकमंत्री म्हणून ही वृक्षतोड थांबवण्याची विनंती केली.

यावर अजित पवार म्हणाले की, हे सगळं ऐकल्यावर कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटायला लागले आहे. जो तो उठतो आणि मला उपदेश करतो. सगळा मक्ता मीच घेतला आहे. यांनी केवळ उपदेश करायचा.

मात्र, त्यांनी वृक्षतोडीच्या मुद्द्यावर थेट भाष्य करणे टाळले. त्याऐवजी, मराठवाडा आणि विदर्भात वृक्षलागवड कमी असल्यामुळे राज्य सरकारने वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतल्याचे सांगितले. यंदा राज्यात 10 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, पुढील चार वर्षांत एकूण 100 कोटी झाडे लावण्यात येतील, असे ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 622
अजित पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.