Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

21/09/2026

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षा रूपवते यांच्याकडून आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, रूपाली चाकणकर…
राजकारण

राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षा रूपवते यांच्याकडून आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, रूपाली चाकणकर…

तक्रारदार मुलीचे नाव सर्व समाज माध्यमांवर जाहीर करण्याची घोडचूक आयोगाने केली. याबद्दल त्यांना सतर्क केल्यानंतरही त्यात कोणताही बदल झालेला नाही.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्रातील महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे रूपवते यांनी म्हटले आहे.

ज्या तत्परतेने पुणे रेव्ह पार्टी आणि प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ठोस भूमिका घेतली, त्याच तत्परतेने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा आरोप करणाऱ्या पीडित दलित मुलीला न्याय मिळवण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ दिला नाही. आयोगाच्या अध्यक्षा पुण्यामध्येच वास्तव्यास असताना, पीडित मुली तीन दिवस सातत्याने पोलीस स्टेशनबाहेर आंदोलनात बसल्या होत्या, तरीही त्यांना भेटायला अध्यक्ष गेल्या नाहीत, असे आयोगाच्या माजी सदस्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी म्हटले आहे.

या उलट, तक्रारदार मुलीचे नाव सर्व समाज माध्यमांवर जाहीर करण्याची घोडचूक आयोगाने केली. याबद्दल त्यांना सतर्क केल्यानंतरही त्यात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे पीडित मुलीच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

प्रत्येक गोष्टीत राजकारणाचा वास येणे ही स्वायत्त संस्था असलेल्या राज्य महिला आयोगाची हेळसांड असून, ती एक शोकांतिका आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. महिलांच्या प्रश्नांवर राजकारण न करता, संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

याप्रकरणी आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडीकडून याप्रकरणी पुढील पाऊल काय उचलले जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 500
उत्कर्षा रुपवते पुणे घटना राज्य महिला आयोग रूपाली चाकणकर
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

सोशल मीडियावर खोटे पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा इशारा; संगमनेरची आर्थिक समृद्धी टिकवण्यासाठी संघर्षाचे आवाहन

By Annant Ppangarkar21/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले…

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.