Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रोटरी क्लब ऑफ संगमनेरने मिळवले ऐतिहासिक यश: ‘बेस्ट प्रेसिडेंट’सह ७ पुरस्कारांची कमाई
यश / निवड / पुरस्कार

रोटरी क्लब ऑफ संगमनेरने मिळवले ऐतिहासिक यश: ‘बेस्ट प्रेसिडेंट’सह ७ पुरस्कारांची कमाई

क्लबला बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट सीपीआर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सायटेशन अवॉर्ड, एजीटीएस अँड डायरेक्टर ट्रेनिंग अवॉर्ड, बेस्ट फोरम मॅनेजमेंट ट्रॉफी, बेस्ट इकॉनॉमिक मॅनेजमेंट अवॉर्ड आणि बेस्ट पार्टिसिपेशन इन न्यू जनरेशन अवॉर्ड असे विविध बहुमान मिळाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ संगमनेरने जालना येथे झालेल्या रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्लबने तब्बल सात मानाचे पुरस्कार पटकावत जिल्ह्यामध्ये आपली छाप पाडली. या सोहळ्यात क्लबचे अध्यक्ष साईनाथ साबळे यांना ‘बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पीडीजी मोहन पालेशा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. सुरेशजी साबू, निर्मला साबू, डीजी सुधीर लातूरे, रो. जयेशभाई पटेल, रो. क्षितिज झावरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील एकूण ९२ क्लबमधून रोटरी क्लब ऑफ संगमनेरची निवड झाली. क्लबला बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट सीपीआर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सायटेशन अवॉर्ड, एजीटीएस अँड डायरेक्टर ट्रेनिंग अवॉर्ड, बेस्ट फोरम मॅनेजमेंट ट्रॉफी, बेस्ट इकॉनॉमिक मॅनेजमेंट अवॉर्ड आणि बेस्ट पार्टिसिपेशन इन न्यू जनरेशन अवॉर्ड असे विविध बहुमान मिळाले.

हे यश केवळ एका व्यक्तीचे नसून, संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ आहे, असे मत अध्यक्ष साईनाथ साबळे यांनी व्यक्त केले. त्यांनी म्हटले, हा सन्मान फक्त माझा नाही, तर संपूर्ण रोटरी क्लब ऑफ संगमनेरच्या टीमचा आहे. डायरेक्टर्स, माजी अध्यक्ष, सदस्य आणि प्रत्येक रोटेरियनच्या सेवाभावामुळेच हे यश शक्य झाल्याचे सांगितले.

या यशामागे क्लबचे नूतन अध्यक्ष विश्वनाथ मालानी, खजिनदार विकास लावरे, उपाध्यक्ष महेश वाकचौरे यांच्यासह रो. नरेंद्र चांडक, दीपक मणियार, रवींद्र पवार, अजित काकडे, सुनील कडलग, भारतभूषण नावंदर, ओंकार सोमाणी, सीए संजय राठी, प्रमोद मणियार, योगेश गाडे, आनंद हासे, सुनील घुले, पवनकुमार वर्मा, राजेंद्र खोसे, डॉ. किशोर पोखरकर, डॉ. विनायक नागरे, डॉ. विकास करंजेकर, डॉ. प्रमोद राजुस्कर, ऋषिकेश मोंढे, संदीप फटांगरे, संजय लाहोटी, बद्रीनारायण इंदानी, संकेत काजळे, अनिल सातपुते, दिलीप मालपाणी, रमेश पावसे, अमित पवार, मधुसूदन करवा, समीर शहा, डॉ. संकेत मेहता, संतोष आहेर, अतुल वखारिया, मयूर मेहता यांसह संपूर्ण टीमचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

२०२४-२५ या वर्षात रोटरी क्लब ऑफ संगमनेरने राबवलेल्या सामाजिक उपक्रमांना मिळालेला हा गौरव त्यांच्या अविरत कार्याचा पुरावा आहे. सीपीआरसारख्या महत्त्वाच्या जीवनरक्षक प्रकल्पांपासून ते नवीन पिढीला संधी देणाऱ्या उपक्रमांपर्यंत प्रत्येक कामात त्यांची गुणवत्ता दिसून आली. या यशाने ‘सर्व्हिस अबोव्ह सेल्फ’ या रोटरीच्या मूळ तत्त्वाला मूर्त स्वरूप दिले असून, संगमनेरसह संपूर्ण जिल्ह्यासाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 607
पुरस्कार रोटरी क्लब
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर येथे ३० ऑगस्टला ‘लोकनेते बाळासाहेब थोरात गुणगौरव पुरस्कार’ सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह २० शिक्षकांचा होणार सन्मान

23/08/2026

प्रवीण बागडे यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

18/08/2026

रोटरी क्लबच्या निवडी जाहीर, यांचा झाला पदग्रहण समारंभ

04/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

By Annant Ppangarkar16/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्यासाठी सकारात्मक विचारांनी भरलेला असेल. दिवसभरात एखादी गोड…

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.