Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

18/09/2026

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » पुणे पोलिसांच्या ‘जंगलराज’वर काँग्रेसचा हल्लाबोल: ‘पीडितांवरच गुन्हा दाखल, हा तर ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार’
राजकारण

पुणे पोलिसांच्या ‘जंगलराज’वर काँग्रेसचा हल्लाबोल: ‘पीडितांवरच गुन्हा दाखल, हा तर ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार’

या घटनेने पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जनतेमध्ये कायद्याच्या राज्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar18/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

मुंबई, दि. १८ ऑगस्ट: पुण्यात पोलिसांचे ‘जंगलराज’ सुरू आहे का, असा संतप्त सवाल विचारत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार असूनही, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याऐवजी उलट पीडित तरुणींवरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केल्याने हा ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका सपकाळ यांनी केली आहे.

१ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर पीडित तरुणींनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना, पोलिसांनी साधी तक्रारही नोंदवून घेतली नाही. त्यामुळे पीडित तरुणींनी १२ तासांहून अधिक काळ पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले.

पोलिसांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही. उलट दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास नकार देत, ‘या प्रकरणी गुन्हा दाखल करता येणार नाही’ असे पत्र देत पीडितांनाच परत पाठवले. या धक्कादायक घटनेनंतर पुणे पोलिसांच्या भूमिकेवर जनमानसातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे की, “ज्या पोलिसांवर कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे, तेच पोलीस जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करत आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्यावर कारवाई होत नाही, उलट ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत. हे पुण्यात पोलिसांचे जंगलराज आल्याचे स्पष्ट निदर्शक आहे.”

या घटनेने पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जनतेमध्ये कायद्याच्या राज्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 463
हर्षवर्धन सपकाळ
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

संगमनेर तालुक्यात ३३ हजार ७९२ हेक्टरवरील खरीप पिकांची दैना; आमदार अमोल खताळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी

16/09/2026

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

गाजलेल्या गीतांचा नजराणा संगमनेरकरांना ‘दिल से’ आवडला! ‘संगमनेर फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस; रहेमान म्युझिकने गाजवला

By Annant Ppangarkar18/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर फेस्टिव्हलमधील दुसरा दिवस गाजवला तो विख्यात संगीतकार ए.आर.रहमान यांच्या…

कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी बसफेऱ्या वळवल्याने संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रवाशांचे हाल; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

18/09/2026

वैद्यकीय क्षेत्र समाजसेवेचे प्रभावी माध्यम; डॉक्टरांनी सेवा भाव जपावा : डॉ. सतिष महाजन

18/09/2026

अवैध वाळू तस्करांवर एलसीबीचा दणका; ३० लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ३ आरोपींना बेड्या

18/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.