Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

17/10/2026

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गुळातील भेसळ: अन्न व औषध प्रशासनाविरोधात ढमाले यांचे गुरुवारपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
आंदोलन

गुळातील भेसळ: अन्न व औषध प्रशासनाविरोधात ढमाले यांचे गुरुवारपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

दरम्यान भेसळखोरांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांकडून आता याप्रकरणी कोणती पावले उचलली जातात याकडे लक्ष लागले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर, प्रतिनिधी: आरोग्याला बाधा निर्माण होऊन देखील शहरातील गुळातील भेसळीच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप करत संगमनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शंकर रावसाहेब ढमाले गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करणार आहे.

ढमाले यांनी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना सांगितले की, शहरातील सिद्धी गुळ नैसर्गिक गुळ नावाने विकल्या जाणाऱ्या मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्या दुकानातून मी गुळ खरेदी केला होता. तो खाल्ल्यानंतर माझ्या घरात दोन व्यक्ती आजारी पडल्या आणि त्यांना रुग्णालयात ॲडमिट करावे लागले. त्यामुळे या गुळात भेसळ असल्याचा संशय आल्याने मी नगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

ढमाले यांनी तक्रारीसोबत FDA ला त्यांनी खाजगी लॅब मध्ये तपासणी केलेला गुळातील भेसळीचा अहवाल देखील दिला होता, मात्र त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ढमाले यांनी माहिती अधिकारांतर्गत कारवाईची माहिती मागितली, तेव्हा ती दोन वेळा नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांनी नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील केले.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात आल्याने ढमाले यांनी थेट या विरोधात आता उपोषणाचा निर्णय घेतला आहे. गुळातील भेसळी सोबतच संगमनेर शहरात आणि तालुक्यात भेसळीचे आणखी सात ते आठ प्रकरणे आहेत. त्यांच्याबद्दलही तक्रारी करण्यात आल्या आहेत, पण या विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेलेली नाही. त्यामुळे हे अधिकारी भेसळयुक्त उत्पादकांच्या मालकांना पाठीशी घालत आहेत. यात काहीतरी काळेबेरे असल्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप ढमाले यांनी केला.

प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळणार नाही, असे वाटल्याने अखेरीस प्रशासनाकडे दाद मागण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून आमरण उपोषणाला बसणार आहे, असे ढमाले यांनी सांगितले. दरम्यान भेसळखोरांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांकडून आता याप्रकरणी कोणती पावले उचलली जातात याकडे लक्ष लागले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 761
अन्न व औषध प्रशासन विभाग उपोषण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक; यांचा ‘दिमाग और दफ्तर ठीक करो’ आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar17/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सामान्य माणसाने स्थानिक पातळीवर न्याय मागायचा, तिथे न्याय मिळाला नाही…

शनिवार, १७ ऑक्टोंबर — तुमचा आजचा दिवस कसा असेल

17/10/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर! बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

16/10/2026

दसरा विशेष: संगमनेरच्या मालपाणी पार्कमध्ये होणाऱ्या ‘या’ खास सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्रमुख आकर्षणे एका क्लिकवर!

16/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.