Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचा कडक इशारा, लैंगिक शोषणासाठी जागा दिल्यास हॉटेल लॉज चालक मालकांवर आता कठोर कारवाई
गुन्हेगारी

अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचा कडक इशारा, लैंगिक शोषणासाठी जागा दिल्यास हॉटेल लॉज चालक मालकांवर आता कठोर कारवाई

यापुढे कोणत्याही परिस्थितीत अशा बेकायदेशीर कृत्यांसाठी लॉज किंवा हॉटेलचा वापर होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करून तात्काळ अटकेची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/08/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

लैंगिक अत्याचारासाठी आपल्या लॉज, हॉटेल किंवा कॅफेचा वापर करण्यास परवानगी देणाऱ्या मालकांवर आता कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (POCSO) मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या सह-आरोपींनाही तितकीच शिक्षा होते. त्यामुळे, अल्पवयीन मुला-मुलींच्या लैंगिक शोषणासाठी जागा उपलब्ध करून देणारे लॉज, हॉटेल चालक, मालक किंवा कॅफे मालक हेही आता कायद्यानुसार गुन्हेगार मानले जातील.

काही दिवसांपूर्वी राहुरी पोलीस ठाण्यात एक बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासात असे समोर आले की, आरोपीने पीडित मुलीला दोन वेगवेगळ्या लॉजमध्ये घेऊन लैंगिक अत्याचार केला. या गंभीर गुन्ह्याची नोंद घेत पोलिसांनी आता त्या दोन्ही लॉजच्या चालकांनाही आरोपी केले आहे. यापुढे अशा प्रकारच्या गुन्ह्यात हॉटेल, लॉज किंवा कॅफेचा वापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास, संबंधित मालकांवरही मुख्य आरोपीप्रमाणेच कठोर कारवाई केली जाईल.

वाघचौरे यांनी पुढे सांगितले की, श्रीरामपूर विभागातील १७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सध्या बाल लैंगिक अत्याचार (POCSO) कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांची पडताळणी केली जात आहे. यामध्ये जर कोणत्याही हॉटेल किंवा लॉज मालकाने निष्काळजीपणा दाखवून अल्पवयीन पीडितेला जागा दिली असल्याचे आढळल्यास, त्यांनाही या गुन्ह्यांमध्ये सह-आरोपी बनवले जाईल.

श्रीरामपूर विभागात संगमनेर, लोणी, कोपरगाव आणि सोनई यांसारख्या शहरांमध्ये अनेक मोठी शैक्षणिक संकुले आहेत. येथे शिक्षण घेण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी येतात, ज्यातील बहुतांश हे अल्पवयीन आहेत. त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व लॉज आणि हॉटेल चालकांनी आपल्या इथे येणाऱ्या पाहुण्यांची योग्य नोंद ठेवणे, त्यांची वयोमर्यादा तपासणे आणि त्याबद्दलचे पुरावे रेकॉर्डवर ठेवणे बंधनकारक आहे. किरकोळ आर्थिक फायद्यासाठी जर कोणी या नियमांकडे दुर्लक्ष केले, तर त्यांना गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा सोमनाथ वाघचौरे यांनी दिला.

यापुढे कोणत्याही परिस्थितीत अशा बेकायदेशीर कृत्यांसाठी लॉज किंवा हॉटेलचा वापर होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असून, दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करून तात्काळ अटकेची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,045
इशारा बाल लैंगिक अत्याचार सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

संगमनेरमध्ये ८८ लाखांचा गांजा जप्त; दोन तस्करांना अटक, तीन साथीदार फरार

06/10/2026

एलसीबी अन्‌ एफडीएची धडक कारवाई; १२.८१ लाखांच्या गुटख्यासह दोघांना अटक, चार जण फरार

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

By Annant Ppangarkar15/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- खाजगी बँकेच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी सतत फोन करून धमकावणे, घरी येऊन…

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.