Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप

June 16, 2026

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » राजकारण्यांना धार्मिक कार्यांपासून दूर ठेवा, ते आग लावतात: नितीन गडकरी
राजकारण

राजकारण्यांना धार्मिक कार्यांपासून दूर ठेवा, ते आग लावतात: नितीन गडकरी

त्यांनी महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींच्या शिकवणीचा उल्लेख करत सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानता या मूल्यांवर भर देण्याचे आवाहन केले.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरSeptember 1, 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – 

माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकारण्यांवर जोरदार टीका केली आहे. राजकारण्यांना धार्मिक कार्यांपासून दूर ठेवावे कारण ते जिथे जातात तिथे ‘आग लावतात’, असे ते म्हणाले.

नागपूरमधील महानुभाव पंथ परिषदेत बोलताना गडकरींनी धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

गडकरी म्हणाले की, धार्मिक कार्य, सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य वेगवेगळी आहेत. राजकारणी जिथे जिथे जातात, तिथे ते आग लावल्याशिवाय निघत नाहीत. धर्माला सत्तेत आणल्यास समाजाचे नुकसान होते, असा इशारा त्यांनी दिला. धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे, मात्र काही राजकारणी त्याचा गैरवापर करतात. यामुळे विकास आणि रोजगारासारखे महत्त्वाचे मुद्दे मागे पडतात, असेही ते म्हणाले.

राजकारणाच्या सध्याच्या स्थितीवर गडकरींनी परखड भाष्य केले. ते म्हणाले, जो लोकांना सर्वात चांगल्या प्रकारे मूर्ख बनवू शकतो, तोच सर्वोत्तम नेता बनू शकतो. राजकारणात प्रामाणिकपणापेक्षा दिखावा आणि फसवणूक वाढली आहे, असे त्यांना सुचवायचे होते.

गडकरींनी त्यांच्या भाषणात बोलणे सोपे आहे, पण करणे कठीण या म्हणीचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, ज्या क्षेत्रात ते काम करतात, तिथे मनापासून सत्य बोलण्यास मनाई असते. यामुळे राजकारणातील दुटप्पीपणा आणि दिखावा अधिक स्पष्ट होतो.

आपल्या भाषणात त्यांनी शॉर्टकटने यश मिळवण्याच्या वृत्तीवरही टीका केली. शॉर्टकटने ध्येय लवकर गाठता येत नाही, तर ते अपूर्णच राहते, असे ते म्हणाले. त्यांनी महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींच्या शिकवणीचा उल्लेख करत सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानता या मूल्यांवर भर देण्याचे आवाहन केले. प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि समर्पण ही मूल्ये समाजात महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 348
नितीन गडकरी महानुभाव पंथ परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप

June 16, 2026

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा फुसका बार; वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांचा थेट हल्लाबोल

June 15, 2026

सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने येणार! २२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

June 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप

By अनंत पांगारकरJune 16, 20260

​विशेष प्रतिनिधी / मुंबई “केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,”…

संगमनेर येथे ‘सत्यशोधक विचारमंच’तर्फे हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

June 16, 2026

रामराज्य शस्त्राने नव्हे, तर संस्कार आणि सदाचाराने येते: रामायणाचार्य ढोक महाराज

June 16, 2026

आज मंगळवार, १६ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 16, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.